जळगाव लाईव्ह न्यूज । ३० ऑक्टोबर २०२१ । शेतकऱ्यांची वीज बिले माफ करून अश्वशक्तिवर आधारित वीज बिले मिळावीत, यासह विविध मागण्यांसाठी शुक्रवार दि.२९ रोजी शेतकऱ्यांकडून ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार अनिल गावीत यांना देण्यात आले. दरम्यान, सरकारने आपली भूमिका बदलली नाही तर मोठे आंदोलन केले जाईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
राज्यात शेतकऱ्यांना अंदाजे दिली जाणारी वीज बिलांची वसुली थांबवावी, शेतकऱ्यांची वीज बिले माफ करून अश्वशक्तिवर आधारित वीज बिले मिळावीत, उसाच्या बिलातून वीजबिल कपात करण्यात येऊ नये, जुन्या सावकारी कायद्यासारखे ऊस बिलातून परस्पर वसुलीचे सरकारने काढलेले आदेश रद्द करावेत आदी मागण्यांसाठी शुक्रवार दि.२९ रोजी चोपडा येथे सर्व शेतकरी संघटना व राजकीय पक्षांच्यावतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. साखर आयुक्त कार्यालयात हरकत नोंदवण्याबाबत तहसील कार्यालयात निदर्शनेही करण्यात आली. तहसीलदार अनिल गावित व पोलिस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांनी, आपले म्हणणे वरिष्ठांना कळवतो, त्यासाठी काही वेळ द्यावा व आंदोलन थांबवावे, अशी विनंती केल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. दरम्यान, सरकारने जर आपली भूमिका बदलली नाही, तर मोठे आंदोलन केले जाईल, असा इशारा यावेळी शेतकऱ्यांनी दिला.
याप्रसंगी संजय बोरसे, आत्माराम म्हाळके, संदीप पाटील, प्रा. प्रदीप पाटील, अमृत महाजन, एस.बी. पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी डॉ.रवींद्र निकम, ऍड. हेमचंद्र पाटील, भागवत महाजन, प्रकाश पाटील, प्रदीप पाटील, हिंमत पाटील, हेमराज पाटील, माधवराव पाटील, प्रा. प्रदीप पाटील, तुळशीराम पाटील, संतोष पाटील, कांतीलाल पाटील, संभाजी पाटील, ऊर्वेश साळुंखे, अनिल वानखेडे, नीलेश बारी, माधवराव करंदीकर, युवराज पाटील, चंद्रकांत पाटील, नारायण पाटील, रमेश सोनवणे, डॉ. दिनकर पाटील, जितेंद्र पाटील, अनिल पाटील, किरण पाटील, संदीप पाटील, अजित पाटील, पुंडलिक महाजन, डॉ. रोहन पाटील, संजय बोरसे, डॉ. प्रकाश पाटील, डॉ. किरण पाटील, गोपाल धनगर, प्रशांत पाटील, डॉ. सुभाष देसाई, आनंद पाटील, संदीप बोरसे यांच्यासह शेकडो शेतकरी हजर होते.