१६ गावांच्या हक्काच्या पाण्यासाठी जिल्ह्यात रास्ता रोको !
जळगाव लाईव्ह न्यूज । १७ मे २०२३ । सध्या संपूर्ण राज्यसह जिल्ह्यात उकाडा जाणवत आहे. अशातच पाणी प्रश्न देखील राज्यात पेटला आहे. चोपडा तालुक्यातील १६ गावातील पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. धरणातून आरक्षित असलेले पाणी पाणीपुरवठा विभाग व पाटबंधारे विभाग यांचे पाणीपट्टी भरणे बाबतचे धोरण आवर्तन सोडण्यास विलंब होत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे व नागरिकांचे मोठे नुकसान होत आहे शेतकरी कृती समितीच्या वतीने आज चोपडा तालुक्यात रास्ता रोको करण्यात आला.
त्या पार्श्वभूमी वर जिल्हाधिकारी धुळे यांनी उद्या तात्काळ बैठक लावली असून येत्या दोन तीन दिवसात पाणी सोडण्यात येईल असे आश्वासन ना.म.व्हट्टे कार्यकारी अभियंता,धुळे पाटबंधारे विभाग,उप अभियंता पी. बी. पाटील,पाणीपुरवठा विभागाचे उप अभियंता मोरे यांनी तहसीलदार अनिल गावीत यांचे समक्ष दिल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले.यावेळी महसूल विभागाचे नेतकर,हरपे,तलाठी पठाण हजर होते.
यावेळी कृती समिती चे एस बी नाना पाटील , अनेर काठ संघर्ष आणि निर्माण समिती चे संयोजक प्रदीप पाटील,प्रदेश सचिव एन.एस.यू.आय. चेतन बाविस्कर, व्ही आर चौधरी ,संजय बोरसे,रामकृष्ण कोळी, पुष्पराज पाटील, जीवन बागुल,किशोर दुसाने,बंडू नाना, शाम देवराज,शिवाजी राजपूत,दिगंबर पाटील,किशोर पाटील ,मंगल पाटील,दिनेश राजपूत, जिजाबराव नेरपगारे यांचेसह शेकडो शेतकरी हजर होते.
३५
५२