जळगाव लाईव्ह न्यूज । ९ ऑगस्ट २०२२ । राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला त्यामध्ये मध्ये भाजपाचे संकटमोचन म्हणून ओळखले जाणारे ना.गिरीश महाजन यांना देखील पुन्हा एकदा कॅबिनेट मंत्रिपदाची संधी मिळाली. त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मुंबई येथे राजभवनात गिरीश महाजन यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पाचोऱ्यात भारतीय जनता पार्टीच्या वतीने अमोल शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत फटाके वाजवत गिरीश महाजन यांच्या समर्थनार्थ घोषणा देत पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. यावेळी कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त करत एकमेकांना पेढे भरवले.
यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी बोलताना सांगितले की, जळगाव जिल्ह्यातील मागील अडीच वर्षात रखडलेली विकास कामे आता मार्गी लागतील तसेच गिरीश महाजन यांच्या नेतृत्वात संपूर्ण उत्तर महाराष्ट्रासह जळगाव जिल्हा आता विकासाच्या दिशेने वाटचाल करेल. असे अमोल शिंदे यांनी बोलताना सांगितले
याप्रसंगी जिल्हा सरचिटणीस मधुकर काटे व्यापारी आघाडी जिल्हाध्यक्ष कांतीलाल जैन, शहराध्यक्ष रमेश वाणी, सरचिटणीस गोविंद शेलार, संजय पाटील, दीपक माने, भाजयुमो शहराध्यक्ष समाधान मुळे भैया ठाकूर, राहुल गायकवाड, वीरेंद्र चौधरी, जगदीश पाटील, प्रशांत सोनवणे, गौरव बोरसे, मुस्लिमशेठ बागवान, विनोद पाटील, भावेश पटेल, भैया चौधरी, अनिल चांदवानी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.