⁠ 
गुरूवार, मे 23, 2024

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तोडण्याचा भाजपचा प्रयत्न – संजय राऊत

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ एप्रिल २०२३ । तपास यंत्रणांच्या दबावानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तोडण्याचा प्रयत्न भाजपाकडून होत असल्याचा गंभीर आरोप संजय राऊतांनी केला आहे.

संजय राऊतांनी भाजपावर हल्लाबोल केला आहे. विरोधी पक्षातील नेत्यांना तुरुंगात टाकण्याचा भाजपाचा डाव आहे. विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न मोदी सरकारकडून होत आहे. तसेच, तपास यंत्रणांच्या दबावाने राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप संजय राऊतांनी केला आहे.

रविवारी नागपुरात मविआची वज्रमूठ सभा पार पडणार आहे. याच पार्श्वभूमीवर राऊत नागपुरात दाखल झाले आहेत. यावेळी बोलताना राऊतांनी भाजपावर निशाणा साधला. मविआची वज्रमूठ सभा होऊ नेय म्हणून भाजपा नेत्यांनी प्रयत्न केले आहेत. मात्र, मविआची सभा ऐतिहासिक होणार असल्याचा विश्वास राऊतांनी व्यक्त केला आहे. तसेच, केंद्रीय मंत्री अमित शाह महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईत येणार आहेत. तर, अमित शाह यांच्या मुंबई वारीवरही राऊतांनी निशाणा साधला. रविवारी होणारी मविआची सभा पाहण्यासाठी अमित शाह येणार असल्याचं राऊत म्हणाले आहेत. तसेच, अमित शाह यांनी मविआची सभा पाहिलीच पाहिजे असेही राऊत म्हणाले.