---Advertisement---
महाराष्ट्र राजकारण

भाजपने पहिली लढाई जिंकली, विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर विजयी

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ जुलै २०२२ । राज्यात महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी वेग आला. या निवडीत भाजपने आपला उमेदवार जाहीर केला. भाजपचे राहुल नार्वेकरयांना उमेदवारी दिली तर शिवसेनेने राजन साळवी यांना उमेदवारी दिली. आधी आवाजी मतदान झाले त्यानंतर मतदान हे वैयक्तिक मतदानाने झाले.महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल नार्वेकर विरुद्ध शिवसेनेचे राजन साळवी अशी थेट लढत झाली यात राहुल नार्वेकर विजयी झाले. त्यांना १६४ मत मिळाली.

rahul narvekar jpg webp

आधी झाले आवाजी मतदान
भाजपचे राहुल नार्वेकरयांना उमेदवारी दिली तर शिवसेनेने राजन साळवी यांना उमेदवारी दिली. हि निवडणूक रोमांचक झाली. आधी आवाजी झाले मात्र नंतर वैयक्तिक मतदानाने मतदान घेण्यात आले.

---Advertisement---

राजन साळवी यांनी अखेरच्या क्षणी भरला अर्ज
महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल नार्वेकर विरुद्ध शिवसेनेचे राजन साळवी अशी थेट लढत झाला. विधानसभा अध्यक्षपदासाठी भाजपनं राहुल नार्वेकरांना संधी दिली. मात्र महाविकास आघाडीकडून शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवार ठरलेला नव्हता. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शेवटचा अर्धा तास उरला असताना महाविकास आघाडीची बैठक झाली. या बैठकीत अखेर राजन साळवी यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला. राजन साळवी यांना नुकतंच शिवसेनेचं उपनेतेपद दिलेलं आहे. या निवडणुकीत आम्ही विजयी होऊ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. शिवसेनेचे अनेक आमदार शिंदे गटात गेले असताना राजन साळवी हे निष्ठावान म्हणून शिवसेनेतच राहिले. यामुळंच त्यांना ही संधी मिळाल्याचं बोललं जात आहे. साळवी यांचा अर्ज भरतेवेळी बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, जयंत पाटील, सुनील प्रभू हे उपस्थित होते.

बहुमत चाचणीवेळी अध्यक्षांची भूमिका महत्वाची 
विधानसभा अध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीकडून शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवाराची घोषणा झालेली नव्हती. शेवटी तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी चर्चा करुन साळवींच्या नावावर शिक्कामोर्तब केला. नवनियुक्त शिंदे सरकारची बहुमत चाचणी दोन दिवसाच्या अधिवेशनात झाले. विधानसभा अध्यक्षांची निवड होणार आहे. शिंदे गट आणि भाजपच्या बहुमत चाचणीवेळी अध्यक्षांची भूमिका महत्वाची असणार आहे. 

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---