---Advertisement---
जळगाव जिल्हा जळगाव शहर महाराष्ट्र राजकारण रावेर

मोठी बातमी! भाजप १३ खासदारांना घरी बसवणार? या यादीत जळगाव आणि रावेरचे नाव?

BJP will not give tickets to Jalgaon and Raver MPs
---Advertisement---

Loksabha Election 2024 | जळगाव लाईव्ह न्यूज । ८ मार्च २०२४ । लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता या २-४ दिवसात लागण्याची शक्यता असून देखील भाजपने आपल्या उमेदवारांबद्दल मोठा सस्पेन्स कायम ठेवला आहे. महायुतीमध्ये कुणाला किती जागा मिळणार? कोणाचा पत्ता कट होणार याची जोरदार चर्चा सुरु आहे. यात आता भर म्हणून ABP Majha या वृत्त वाहिनीने एक यादी जाहीर केली आहे. यात जवळपास १३ खासदारांना भाजप तिकीट नाकारणार असल्याचे सांगण्यात आले आहे. पक्षांतर्गत केलेल्या सर्वेनुसार समाधानकारक कामगिरी नसणाऱ्या १३ खासदारांना भाजप घरी बसवणार आहे.

जळगाव आणि रावेरमध्ये देखील बदल होणार?

BJP will not give tickets to Jalgaon and Raver MPs

समोर आलेल्या या यादीत जळगावचे खासदार उन्मेष पाटील व रावेरच्या खासदार रक्षा खडसे यांचे देखील नाव असल्याचा दावा ABP Majha ने दिलेल्या बातमीत करण्यात आला आहे. जळगाव जागेसाठी उन्मेष पाटील यांच्याऐवजी स्मिता वाघ, ए. टी. पाटील, दिलीप पाटील, रोहित निकम यांचे नाव चर्चेत आहेत. तर रावेर जागेसाठी विद्यमान खासदार रक्षा खडसे यांच्याऐवजी डॉ. केतकी पाटील अथवा अमोल जावळे यांचे नाव आघाडीवर आहेत.

---Advertisement---

इतर राज्यांप्रमाणे भाजप यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात देखील धक्कातंत्र वापरणार असल्याचे जाणकारांचे मत आहे. त्यामुळे भाजपच्या अनेक विद्यमान खासदारांना धक्का बसणार आहे. पुढील दोन-तीन दिवसांत दिल्लीतून भाजप उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार आहे. मात्र, या यादीत अनेक नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाणार असून, तब्बल डझनभर विद्यमान खासदारांचा पत्ता कट होणार आहे.सामाजिक समिकरणांसह स्थानिक पातळीवरील राजकारण, विद्यमान खासदाराबाबत असलेली नाराजी, निवडून येण्याची हमी असलेल्या मजबूत उमेदवारांची आवश्यकता, 3 पेक्षा अधिक वेळा निवडून आल्याने काहींच्या तिकिटाबाबत असलेले आक्षेप, या कारणांमुळे भाजप डझनभर विद्यमान खासदारांची तिकिटे कापण्यार आहे.

या जागांवर असणार नवीन उमेदवार

  1. जळगाव
  2. रावेर
  3. बीड
  4. धुळे
  5. सोलापूर
  6. सांगली
  7. लातूर
  8. उत्तर मुंबई
  9. उत्तर मध्य मुंबई
  10. नांदेड
  11. अहमदनगर
  12. नंदुरबार
  13. वर्धा

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---