जळगाव लाईव्ह न्यूज । २६ डिसेंबर २०२१ । पाचोरा येथील अटल भारतीय जनता पार्टी कार्यलयात भारतरत्न माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंती निमित्त एक छोटेखानी कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी अटलजी वाजपेयी यांचा प्रतिमेचे पूजन करण्यात आले तसेच येथील रेल्वे स्थानकावर गरजूंना मोफत ब्लॅंकेट देखील वाटप करण्यात आले.
दरम्यान, पाचोरा तालुक्यातील पक्षातील जेष्ठांना सत्कार करून सन्मानित करण्यात आले तसेच जनसंघापासून ते भारतीय जनता पार्टीच्या जडणघडणीत मोलाची भूमिका निभावून पक्ष वाढीसाठी अहोरात्र मेहनत घेणारे शांतीलालजी मोर यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचा सन्मान करण्यात आला तसेच त्यांच्यासह जेष्ठ पदाधिकारी महेंद्रचंद संचेती, किशोरजी संचेती, रविजी पांडे, सदाशिवआबा पाटील, विश्वनाथ लोहार, रवींद्र पाटील, महेंद्रजी मिस्तरी, यांना भाजपा कार्यलयात सत्कार करून सन्मानीत करण्यात आले. यावेळी सदाशिव पाटील यांनी मनोगत व्यक्त करून अटलजी वाजपेयी यांचा संपूर्ण जीवनप्रवास यावेळी उपस्थित युवा पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सांगितला.
तसेच अटलजींच्या जयंतीनिमित्त भाजपा व्यापारी आघाडीच्या माध्यमातून पाचोरा रेल्वे स्थानकावर गरजूंना मोफत ब्लॅंकेट देखील वाटप करण्यात आले.
या प्रसंगी भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे, व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष कांतीलाल जैन, शहराध्यक्ष रमेश वाणी, महिलाआघाडी जिल्हाध्यक्ष रेखाताई पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख हिम्मतसिंग निकुंभ, नगरसेवक विष्णु अहिरे, उपाध्यक्ष प्रमोद सोमवंशी, शहराध्यक्ष नंदूबापू सोमवंशी, प्रज्ञावंत आघाडी अध्यक्ष सुनीलजी पाटील, रमेश श्यामनानी, सरचिटणीस राजेश संचेती, भाजयुमो शहराध्यक्ष समाधान मुळे, भैया ठाकूर, जगदीश पाटील, विरेंद्र चौधरी, राहुल जैन, प्रशांत सोनवणे, नितीन तायडे, प्रांजल जैन, समाधान पाटील, नामदेव धोबी, जितू नागरानी आदी पदाधिकारी उपस्थित होते.
हे देखील वाचा :
- आज धनत्रयोदशी! जाणून घ्या पूजाविधी आणि शुभ मुहुर्त..
- उत्तर महाराष्ट्रातून लोकमत खान्देश पॉलिटिकल आयकॉन पुरस्काराने अमोल शिंदे सन्मानित
- जळगावच्या ज्येष्ठ नागरिकांना आता कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे दर्शन घेण्याची संधी, ६ ऑक्टोबरपर्यंत करा अर्ज
- दहाव्या अजिंठा वेरूळ आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या मानद अध्यक्षपदी प्रसिध्द दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांची नियुक्ती
- ना.गुलाबराव पाटील यांच्या पुढाकाराने 3 हजार वारकऱ्यांना पंढरपूर वारी