जळगाव शहर

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या प्रतिमेला जळगावात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मारले जोडे

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ मे २०२२ । खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात वक्तव्य केले म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जळगावात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात जोडेमारो आंदोलन केले. यावेळी सदर वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने निषेध व्यक्त करण्यात आला व चंद्रकांत पाटिल यांच्या प्रतिमेला चपलांचा हार घालुन जोडे मारो आंदोलन करण्यात आले .

खासदार सुप्रिया सुळे यांचे देशाच्या व राज्याच्या राजकारण व समाजकारणात मोठे योगदान आहे . त्यामुळेच भारतीय संसदेने त्यांना तब्बल सात वेळेस संसदरत्न पुरस्कार दिलेला आहे . असे असतांना देखील भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटिल यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याविषयी ” घरी भाकरी थापा , स्मशानात जा ” असे बेताल व निंदनीय वक्तव्य केलेले आहे , असे वक्तव्य करून पाटिल यांनी सुप्रिया सुळे व समस्त नारीशक्तीचा अपमान केलेला आहे अशी प्रतीक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे देण्यात आली.

पुढे ते म्हणेल कि, याउलट चंद्रकांत पाटील यांचे महाराष्ट्रात काहीच योगदान नाही , म्हणूनच स्वतःच्या कोल्हापूर मतदारसंघात निवडणूक येण्याची देखील त्यांची लायकी नाही . एका महिलेला डावलून राजकिय अन्याय करत कोथरूड मतदार संघात महिलेला डावलून चंद्रकांत पाटिल निवडणून आलेले आहेत . तरीही त्यांनी सुप्रियाताईंबद्दल असे वक्तव्य करणे अत्यंत गैर व खेदजनक आहे .


वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने निषेध व्यक्त करण्यात आला व चंद्रकांत पाटिल यांच्या प्रतिमेला चपलांचा हार घालुन जोडे मारो आंदोलन करण्यात आले . आंदोलनात माजी आमदार मनीष जैन , महानगर अध्यक्ष अशोक लाडवंजारी , युवक जिल्हा अध्यक्ष रवींद्र नाना पाटिल , अरविंद मानकरी, रिकू चौधरी , सुशील शिंदे , अमोल कोल्हे , राजू मोरे , किरण राजपूत , अकिल पटेल , रहीम तडवी , मजहर पठाण , आशा अंभोरे , जयश्री पाटिल , विमल मोरे , अर्चना शिंदे , अशोक सोनवणे , रमेश बाहरे, नईम खाटिक , राहुल टोके , किरण चव्हाण , जितेंद्र बागरे , राजा मिर्झा आदि कार्यकर्ते सहभागी झाले .

Related Articles

Back to top button