भाजपची लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर ; जळगावात धक्कातंत्र, वाचा कुणाचा पत्ता कट
जळगाव लाईव्ह न्यूज । १३ मार्च २०२४ । भारतीय जनता पक्षाने आज लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. भाजपने दुसऱ्या यादीत एकूण 72 उमेदवारांची नावे जाहीर केली असून त्यात या यादीत महाराष्ट्रातील 20 उमेदवारांचा समावेश आहे. जळगावमध्ये भाजपने धक्कातंत्राचा वापर केला आहे.
जळगाव लोकसभा मतदारसंघामधून विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांचं तिकीट कापण्यात आलं आहे. जळगाव मधून स्मिता वाघ यांना उमेदवारी देण्यात आली आहे.दुसरीकडे रावेरमधून रक्षा खडसे यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली
भाजपने जाहीर केलेल्या आजच्या यादीत महाराष्ट्रातील 20 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यादीत भाजप नेत्या पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार, रक्षा खडसे यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांचा समावेश आहे. जळगावमधून स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर सुधीर मुनगंटीवार यांना चंद्रपूरमधून उमेदवारी घोषित करण्यात आली आहे.