⁠ 

फुकट्यांनो सावधान : रेल्वेने एकाच दिवसात वसूल केला ११ लाखांचा दंड

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ एप्रिल २०२३ ।  रेल्वेतुन फुकट प्रवास करणात्या फुकट्या प्रवास्यांना भुसावळ विभागाने मोठा दणका दिला आहे कारण अश्या फुकट्या प्रवाशांकडून तब्बल ११ लाख रुपयांचा दंड वासून करण्यात आला आहे. यामुळे फुकट्यांमध्ये एकाच खळबळ उडाली आहे.

तिकीट तपासणीची विशेष मोहिम हाती घेण्यात आली. चार अधिकारी व 81 तिकीट तपासणी कर्मचार्‍यांसह रेल्वे सुरक्षा बलाच्या 21 कर्मचार्‍यांची मदत घेत अप-डाऊन 42 गाड्यांमध्ये मंगळवार, 25 रोजी तपासणी करण्यात आली. त्यात एक हजार 619 प्रवाशांकडे तिकीट न आढळल्याने त्यांच्या 11 लाख 11 हजार 40 हजारांचा दंड वसुल करण्यात आला तर एकाच दिवसातील नियमित तपासणीत चार हजार 190 प्रवाशांकडून 33 लाख 35 हजार 310 रुपयांचा दंड वसुल करण्यात आल्याने फुकट्या प्रवाशांच्या गोटात खळबळ उडाली.

भुसावळ विभागाचे डीआरएम एस.एस.केडिया, वरीष्ठ वाणिज्य प्रबंधक शिवराज मानसपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवार, 25 एप्रिल रोजी दिवसभरात विशेष मोहिम राबवण्यात आली तसेच नियमित तपासणी करण्यात आल्यानंतर फुकट्या प्रवाशांकडून चार हजार 190 प्रवाशांकडून 33 लाख 35 हजार 310 रुपयांचा दंड वसुल करण्यात आाला. अप-डाऊन मार्गावरील 42 धावत्या गाड्यांमध्ये तसेच रेल्वे स्थानकावर पथकाकडून तपासणी करण्यात आली.

रेल्वे प्रवाशांनी कटू कारवाई टाळण्यासाठी योग्य तिकीट काढून योग्य वर्गाच्या डब्यातच प्रवास करावा, असे आवाहन वरीष्ठ वाणिज्य प्रबंधक शिवराज मानसपुरे यांनी केले आहे. रेल्वे प्रवाशांनी तिकीट खिडकीवरील लांबलचक रांगेपासून सुटका करण्यासाठी युटीएस अ‍ॅपचा वापर करावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.