---Advertisement---
जळगाव शहर राजकारण

‘नवग्रह’चा विश्वास डगमगतोय? ‘मारोती’ला केली प्रार्थना

navgrah
---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ मार्च २०२१ । शहर मनपाच्या राजकारणाचे चित्र पलटविण्यात मोठी भूमिका बजावणाऱ्या नवग्रह नगरसेवकांची शक्ती डगमगतेय की काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. महिला व बालकल्याण सभापती रंजना सपकाळे यांचे पती भारत सपकाळे यांनी शिरसाळेच्या मारोतीला काढलेला फोटो व्हाट्सअँप स्टेटसला ठेवले असून त्यावर ‘इतनी शक्ती हमे दे ना दाता’ हे गाणे लावले आहे.

navgrah

जळगाव शहरात मोठे राजकीय फेरबदल झाले असून त्यामागे नवग्रह नगरसेवकांचा मोठा हात आहे. शिरसाळेच्या मारोतीवर नवग्रह मंडळाने दर्शन घेत शपथ घेतली होती. मनपात शिवसेनेची सत्ता प्रस्थापित झाली असून नवनिर्वाचित महापौर सौ.जयश्री महाजन उद्या कामाला सुरुवात करणार आहेत. तत्पूर्वी नवग्रह मंडळातील सदस्य भारत सपकाळे यांनी शिरसाळे मारोतीचा सेल्फी व्हाट्सअँप स्टेटसला ठेवला आहे. सेल्फीला ‘इतनी शक्ती हमे दे ना दाता मन का विश्वास कमजोर हो ना’ हे गाणे लावून प्रार्थना केली आहे.

---Advertisement---

हे देखील वाचा : 

आमदार राजुमामांना होती ५ नगरसेवकांची ‘चिंता’ अन् ३० नगरसेवकांची पडली ‘विकेट’!

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---