पाचोरा तालुक्यातील भाजप पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश

नोव्हेंबर 22, 2021 1:56 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ नोव्हेंबर २०२१ । पाचोरा तालुक्यातील नाइकनगर व आंबे वडगाव येथील भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील व आमदार किशोर पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.

Shivsena 4 jpg webp

पाचोरा-भडगाव मतदार संघात भाजपा पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेकडे ओढा कायम असून नुकतेच पाचोरा तालुक्यातील नाइकनगर व आंबे वडगाव येथील भाजपच्या संस्कृती आघाडीचे तालुकाध्यक्ष विजय राठोड, नाईकनगर येथील भाजपचे माजी सरपंच गोपी चव्हाण यांसह इतर कार्यकर्त्यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील व आमदार किशोर पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. आमदार किशोर पाटील यांच्या ‘शिवालय’ या संपर्क कार्यालयात हा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी त्यांचे शिवसेना पक्षात स्वागत केले. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य दीपकसिंग राजपूत, शेतकरी आघाडीचे अरुण पाटील, डॉ.धनराज पाटील, लोहाराचे उपसरपंच अक्षय जैस्वाल, सुभाष राठोड, श्रीराम राठोड, जगन चव्हाण, रामकृष्ण मोची, गुरुदास चव्हाण यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

घुसमट होत असल्याने घेतला निर्णय
आपण भाजप पक्षात काम करत असताना आपल्याला योग्य न्याय मिळू शकणार नाही, याची जाणीव झाल्याने व पक्षात होणारी घुसमट लक्षात घेऊन आपण शिवसेनेची कास धरली. आमदार किशोर पाटील यांच्या नेतृत्वात वंजारी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सर्वोतोपरी प्रयत्नरत राहणार असल्याचे विजय राठोड यांनी यावेळी बोलतांना सांगितले. आमदार किशोर पाटील यांनी देखील पक्षात त्यांचा योग्य सन्मान राखत त्यांचेवर लवकरच योग्य ती जबाबदारी देणार असल्याचे सांगितले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now