⁠ 
रविवार, नोव्हेंबर 24, 2024
Home | जळगाव जिल्हा | रावेर | सावदा-रावेर रस्त्याच्या दुरावस्थेबाबत भाजपा पदाधिकाऱ्यांनी धरले सा.बां.अभियंत्यांना धारेवर

सावदा-रावेर रस्त्याच्या दुरावस्थेबाबत भाजपा पदाधिकाऱ्यांनी धरले सा.बां.अभियंत्यांना धारेवर 

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ ऑक्टोबर २०२१ । बुऱ्हाणपूर -अंकलेश्वर हायवेवरील सावदा ते रावेर दरम्यान पडलेल्या मोठ मोठ्या खड्यांसंबंधी आज सार्वजनिक बांधकाम कार्यालय सावदा येथे सा.बां विभागाचे कार्यकारी अभियंता शेखयांना भाजपा पदाधिकाऱ्यांनी चागलेच धारेवर धरले. गेली अनेक दिवसांपासून सावदा रावेर दरम्यान रस्त्यावर खूप मोठ मोठे खड्डे पडलेले आहेत.

या खड्यांमुळे आज पर्यंत अनेक छोटे मोठे अपघात घडत असतात यामधे अनेकांनी आपला जीव गमावलेला आहे नुकतेच दोन दिवसापूर्वी मस्कावद सिम येथील महिलेचा आपल्या आईच्या अंत्यदर्शनासाठी जात असताना याच खड्डयांमुळे अपघात होऊन मृत्यू झाला. वारंवार तक्रार करून ही सार्वजनिक बांधकाम विभाग नाकर्तेपणामुळे नाहक लोकांचे जीव जात असून याचा जाब विचारण्यासाठी आज राहुल पाटील यांच्या नेतृत्वात सावदा येथे जाऊन शेख यांना जाब विचारण्यात आला.

जळगाव येथील मुख्य कार्यकारी अभियंता सौ. गिरासे मॅडम यांचेशी राहुल पाटील यांनी यासंबधी तक्रार केली व लवकरात लवकर खड्डे बुजण्यात यावे व रस्ता दुरुस्ती करावा अशी मागणी केली. त्यावेळी गीरासे मॅडम यांनी येत्या दोन दिवसात खड्डे बुजण्याची व्यवस्था करतो असे सांगितले आहे. यावेळी भाजपा पदाधिकारी राहुल पाटील, भाजपा तालुका उपाध्यक्ष संजय माळी, वाघोदा सरपंच मुबारक तडवी, उपसरपंच लक्ष्मीकांत चौधरी, गोकुळ महाजन, विशाल पाटील, बाळु काकडे, मुरलीधर महाजन,स्वप्नील पवार व कार्यकर्ते उपस्थित होते.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.