⁠ 
बुधवार, ऑक्टोबर 30, 2024
Home | राजकारण | भाजपची नवीन प्रदेश कार्यकारिणी जाहीर ; जळगावात यांना मिळाले स्थान?

भाजपची नवीन प्रदेश कार्यकारिणी जाहीर ; जळगावात यांना मिळाले स्थान?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ मे २०२३ ।  2024 च्या लोकसभेसाठी भाजपने आतापासून कंबर कसली आहे. दरम्यान, महाराष्ट्राचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज नवीन प्रदेश कार्यकारिणी जाहीर केली यात भुसावळचे माजी नगरसेवक तथा भाजपच्या ओबीसी सेलचे माजी पदाधिकारी अजय एकनाथ भोळे यांना प्रदेश चिटणीसपदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

भाजपने नवीन प्रदेश कार्यकारिणी जाहीर केली. यात प्रदेशाध्यक्षांसह उपाध्यक्ष, सरचिटणीस आणि चिटणीस यांचा समावेश आहे. जिल्ह्याचा विचार केला असता माजी आमदार स्मिता वाघ यांना पुन्हा एकदा प्रदेश उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी मिळाली आहे. अर्थात, त्यांचे पद कायम राखण्यात आलेले आहे.

यासोबत भुसावळचे माजी नगरसेवक तथा भाजपच्या ओबीसी सेलचे माजी पदाधिकारी अजय एकनाथ भोळे यांना प्रदेश चिटणीसपदावर नियुक्ती मिळाली आहे. ते पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी असून ग्रामविकास मंत्री ना. गिरीश महाजन यांचे कट्टर समर्थक आहेत. त्यांच्या नियुक्तीचे सर्वत्र स्वागत होत आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.