⁠ 
शुक्रवार, मे 3, 2024

…ही तर शेतकऱ्यांची एक प्रकारे चेष्टा ; गिरीश महाजनाची टीका

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ जून २०२१ । शेकडो शेतकऱ्यांकडे आजही हजारो क्विंटल मका व ज्वारी पडलेली आहे. परंतु शासनाने हमी भावात अत्यंत कमी प्रमाणात म्हणजे १६५० क्विंटल ज्वारी१५०० क्विंटल मका खरेदी करण्याची ज्याचंक अशी अट घातली आहे. त्यामुळे यातून फक्त वीस-पंचवीस शेतकऱ्यांची मका व ज्वारी खरेदी होऊ शकते. ही तर शेतकऱ्यांची एक प्रकारे चेष्टा केली. मुळात राज्‍य सरकार हे शेतकऱ्याच्‍या समस्‍या सोडविण्यात अपयशी ठरले असल्‍याचा आरोप माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांनी केला.

जामनेर बाजार समितीच्या आवारात शेतकरी सहकारी संघाच्यावतीने आज (ता.१४) शासकीय भरड धान्य खरेदी केंद्राचा शुभारंभ आमदार महाजन यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. 

शेतकर्‍यांकडे हजारो क्विंटल ज्वारी व मका पडून आहे. परंतु शासनाने हमी भावात अत्यंत कमी प्रमाणात म्हणजे १६५० क्विंटल ज्वारी१५०० क्विंटल मका  खरेदी करण्याची ज्याचंक अशी अट घातली आहे. त्यामुळे यातून फक्त वीस-पंचवीस शेतकऱ्यांची मका व ज्वारी खरेदी होऊ शकते. मग खरेदी केंद्र हे फक्त नावालाच सुरू केले जात आहे का? असे असेल तर मग बाकीच्या शेतकऱ्यांनी आपले धान्य बाहेर व्यापाऱ्याकडे देऊन आपले आर्थिक नुकसान करायचे काय? यातून असे दिसते की निवड शेतकऱ्यांची ही थट्टाच नाही तर काय शासनातर्फे ज्वारीला २६२० आणि मक्‍याला १८५० हमी भाव दिला जाणार आहे.

एवढी कमी प्रमाणात खरेदी ही शासनातर्फे केले जाणार असल्यामुळे शेतकऱ्यांना नाईलाजास्तव बाहेर आपला मका व ज्वारी द्यावा लागणार आहे आणि त्यातून शेतकऱ्यांचे खूप मोठे आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार आहे. परिणामी असे दिसून येते की शासनाने शेतकऱ्यांची एक प्रकारे थट्टा चालविली आहे असेही आमदार गिरीश महाजन यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. 

यांची होती उपस्थिती

यावेळी आनंदा पाटील (रा. चिंचखेडा) या शेतकऱ्याचा गिरीष महाजन यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या शुभारंभप्रसंगी तहसिलदार अरुण शेवाळे, शेतकी संघाचे सभापती चंद्रकांत बाविस्कर, उपसभापती बाबुराव गवळी, संचालक डॉ. सुरेश पाटील, रमेश नाईक, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय देशमुख, सचिव प्रसाद पाटील आदी होते.