---Advertisement---
जळगाव शहर राजकारण

.. म्हणून गिरीश महाजनांनी गुलाबरावांना पेढा भरवला

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ मार्च २०२२ । गुरुवारी पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला. पाचपैकी चार राज्यात भाजपला दणदणीत विजय (BJP Wins) मिळविल्यानंतर महाराष्ट्रात सर्वत्र भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांतर्फे जल्लोष (BJP Celebration) साजरा केला. विशेषतः गोव्यात भाजपने बहुमत मिळवल्यामुळे तेथील प्रभारी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांचा सत्कार समारंभ मुंबईत आयोजित करण्यात आला. यानंतर भाजप आमदारांनी विधानभवना बाहेरही विजयोत्सव साजरा केला.

gulabrao patil girish mahajan jpg webp

विधिमंडळाच्या पायऱ्यांवर एकमेकांना पेढे वाटून आमदारांनी आनंद व्यक्त केला. यावेळी भाजप नेते गिरीश महाजन यांनीही शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांना विजयाचा पेढा भरवला. त्यामागून आलेले सपा नेते अबू आझमी यांनाही महाजनांनी पेढा दिला. कालिदास कोळंबकरांनीही आझमींना पेढा भरवण्याची संधी सोडली नाही

---Advertisement---

दरम्यान, आज महाविकास आघाडी सरकारकडून राज्याचा अर्थसंकल्प (Maharashtra Budget 2022) सादर होत असून राज्याचे अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) विधानसभेत अर्थसंकल्प सादर करीत आहे. या अर्थसंकल्पात राज्यातील पायाभूत विकासासंदर्भात काही महत्त्वपूर्ण घोषणा होण्याची शक्यता आहे. तसेच सामान्य माणसांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

विधिमंडळाच्या पायऱ्यांवर भाजप नेते गिरीश महाजन यांनी मुंबई भाजप कार्यालयात विजयी जल्लोष झाल्यानंतर भाजप आमदारांनी विधानभवना बाहेरही विजयोत्सव साजरा केला. एकमेकांना पेढे वाटून आमदारांनी आनंद व्यक्त केला.

चार राज्यांतील निवडणुकांच्या निकालांमुळे एक गोष्ट स्पष्ट झाली आहे. सामान्य माणसाच्या मनावर अजूनही नरेंद्र मोदी यांची जादू कायम आहे. उत्तर प्रदेश आणि गोव्यात मोदींच्या प्रभावामुळेच अँटी-इन्कम्बन्सीचे रुपांतर प्रो-इन्कम्बन्सीमध्ये झाले.

चार राज्यातील विधानसभा निवडणुकीत भाजपने सत्ता मिळवली. त्यानंतर महाराष्ट्रातही विधिमंडळाच्या पायऱ्यांवर भाजप आमदारांनी जल्लोष केला.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---