⁠ 
रविवार, जून 2, 2024

भाजपातर्फे ओबीसी समाज जनजागृती जागर अभियान

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ नोव्हेंबर २०२१ । यावल शहरात भारतीय जनता पक्षाच्या वतीने ओबीसी समाज जनजागृती जागर अभियान राबविण्यात आले. तसेच जागर रथाचे यावल येथील भारतीय जनता पक्षाचे पदधिकारी व कार्यकर्ते यांनी स्वागत केले.

सविस्तर असे की, यावल शहरात भारतीय जनता पक्षाच्या वतीने ओबीसी जागर अभियान रथयात्रा काढण्यात आली. हा जागर रथ संपूर्ण राज्यात फिरणार आहे. मागील काही दिवसांपासून भारतीय जनता पक्ष हे संपूर्ण ओबीसी समाजाच्या विरोधात असल्याचे अपप्रचार काही मंडळींकडून करण्यात येत असून याच पार्श्वभूमीवर पक्षाच्या वतीने समाजात जनजागृती व्हावी याकरीता ओबीसी जागर अभीयान राबविण्यात येत आहे.

या परिसरात रथयात्रा काढली 

या अभियानांतर्गत यावल शहरातील बुरुज चौक, जुना भाजी बाजार चौक, बोरावल गेट, महाजन गल्ली, वाणी गल्ली परिसर, म्हसोबा चौक, कोर्ट रोड, भुसावळ टी पॉईंट, बस स्टॅन्ड, पंचायत समिती परिसरात रथयात्रा काढण्यात आली.

यांची उपस्थिती होती 

या प्रसंगी भाजपाचे यावल तालुकाध्यक्ष उमेश फेगडे, युवा नगरसेवक डॉ. कुंदन फेगडे, भारतीय जनता पक्ष ओबीसी सेल जिल्हा उपाध्यक्ष हेमराज फेगडे, माजी यावल तालुका खरेदी विक्री सहकारी संघाचे नरेंद्र नारखेडे, तालुका उपाध्यक्ष नितिन नेमाडे, शहराध्यक्ष निलेश गडे, युवा मोर्चा शहराध्यक्ष रितेश बारी, शहर सरचिटणीस पऱीष नाईक, शहर उपाध्यक्ष योगेश चौधरी, तेजस पाटील ,भूषण फेगडे ,स्नेहल फिरके, मनोज बारी, विशाल बारी, उज्वल कानडे, सागर लोहार उपस्थिती होती.