---Advertisement---
जळगाव शहर राजकारण

विधानसभेसाठी भाजप जळगाव शहरात भाकरी फिरणार!

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज : १ जूलै २०२४ : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी संपताच महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निवडणूकपूर्व हालचालींना वेग आला आहे. राज्यात भाजपाची मोठी पडझड झाली असली तरी जळगाव जिल्ह्याने भाजपावर विश्वास ठेवत महायुतीच्या दोन्ही उमेदवारांच्या पारड्यात भरघोस मते टाकली आहे. यामुळे भाजपात इच्छुकांची संख्या वाढली आहे. यात विद्यमान आमदार राजूमामा भोळे, रोहित निकम, डॉ. अश्विन सोनवणे, डॉ. केतकी पाटील तर  विरोधी पक्षाकडून जयश्री महाजन, कुलभुषण पाटील यांच्या नावांची चर्चा आहे.

jalgaon vidhansabha jpg webp

जळगाव शहरात लेवा व मराठा समाजाची मोठ्या प्रमाणात मते आहेत. गत दोन पंचवार्षिकपासून भाजपाचे राजूमामा भोळे हे जळगाव शहरातून विधानसभेवर निवडून जात आहेत. आताही भाजपाकडून त्यांच्या नावाची चर्चा आहे. लोकसभेत पडझड झाल्यानंतर आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपाकडून सावध खेळी खेळली जाण्याची दाट शक्यता आहे. जरांगे फॅक्टर लक्षात घेता भाजपकडून जिल्ह्यात मराठा कार्ड खेळू शकते.

---Advertisement---

भाजपकडे आजच्या घडीला चाळीसगाव मतदार संघातून मंगेश चव्हाण हे एकमेव मराठा आमदार आहेत. त्यामुळे चाळीसगावसह जळगाव शहरातही मराठा कार्ड खेळले जाणार असल्याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. जर भाजपाने मराठा समाजाला उमेदवारी देण्याचे ठरविल्यास भाजपाकडून मार्केटींग फेडरेशनचे राज्य उपाध्यक्ष रोहीत निकम यांचे नाव ऐनवेळी पुढे येवू शकते, अशी अटकळ बांधली जात आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---