जळगाव लाईव्ह न्यूज । १७ मार्च २०२१ । जळगाव महापालिकेच्या महापौर-उपमहापौर पदाची निवडणूक ऑनलाईन होणार आहे. याविरोधात ऑनलाइनऐवजी सभागृहात प्रत्यक्ष मतदान घ्यावे अशी मागणी औरंगाबाद खंडपीठातभाजपतर्फे करण्यात आली आहे.
न्या. संजय गंगापूरवाला व न्या. श्रीकांत कुलकर्णी यांच्यासमोर सुनावणी होणार असून काय निर्णय येतो याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. भाजपचे अनेक बंडखोर नगरसेवक शिवसेनेला जाऊन मिळाल्याने भाजप नेत्यांची चांगलीच धावपळ सुरु आहे.
रंजना विजय सोनार आणि विश्वनाथ सुरेश खडके यांनी विभागीय आयुक्त व मनपा आयुक्तांच्या ५ मार्च २०२१ रोजीच्या ऑनलाइन निवडणुकीच्या घोषणेला आव्हान दिले आहे. पिंपरी चिंचवड आणि नागपूर मनपाच्या निवडणुका सभागृहात नुकत्याच झाल्या आहेत. त्यामुळे जळगाव मनपाची निवडणूक ऑनलाइन घेणे चुकीचे आहे, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. विश्वासार्ह आणि पारदर्शक वातावरणात निवडणूक व्हावी, यासाठी प्रत्यक्ष सभागृहात उपस्थित राहून मतदान घ्यावे, अशी विनंती त्यांनी केली आहे.