⁠ 
गुरूवार, डिसेंबर 5, 2024
Home | राजकारण | बंडखोरांच्या एंट्रीमुळे भाजपा नगरसेवक नाराज!

बंडखोरांच्या एंट्रीमुळे भाजपा नगरसेवक नाराज!

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ ऑगस्ट २०२२ । जळगाव मनपातील मूळ भाजपातील असलेले नगरसेवक नाराज आहेत. जिल्ह्यातील पक्षश्रेठींकडून बंडखोरांना मिळत असलेल्या स्पेशल ट्रेंटमेंट मुळे भाजपा नगरसेवक नाराज आहेत. पक्षात बंडखोरी करत सत्ता उलथवून टाकलेल्या बंडखोर नगरसेवकांना पुन्हा एकदा भाजपामध्ये यायचे आहे. यासाठी बंडखोरांच्या बैठका सुद्धा सुरु झाल्या आहेत. यामुळे भाजपा नगरसेवक नाराज आहेत.

या नाराजीमुळेच मंत्री महाजनांकडे नगरसेवकांनी एक मागणी केली आहे. अडीच वर्षांपूर्वी जळगाव महानगरपालिकेमध्ये भाजपामध्ये बंडखोरी करत शिवसेनेत न जाता भाजपा विरोधात न्यायालयात जात स्वतःचा गटनेता बनवण्याची प्रक्रिया राबवलेल्या बंडखोर नगरसेवकांना पुन्हा भाजपात पुन्हा घेऊ नका. या नगरसेवकांना शिक्षा व्हायलाच हवी अशांना माफ करू नका अशी मागणी भाजपा नगरसेवकांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे केली आहे.

जळगाव शहर महानगरपालिका मध्ये झालेले अभूतपूर्व सत्ता परिवर्तन संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आहे. त्यावेळी भारतीय जनता पक्षातून शिवसेनेत प्रवेश न करता स्वतःचा गट स्थापन करत भारतीय जनता पक्षाच्या काही बंडखोर नगरसेवकांनी शिवसेनेचा महापौर बसवला तर उपमहापौर बंडखोरांचा झाला. यावेळी मूळ शिवसेनेत असलेल्या जयश्री महाजन महापौर झाल्या तर भाजपमध्ये राहूनच कुलभूषण पाटील हे उपमहापौर झाले.

मात्र त्यानंतर बंडखोरांमध्ये झालेल्या आपापसातल्या मतभेदांमुळे आणि न मिळत असलेल्या विकासकामांच्या निधीमुळे बंडखोरांमधला एक गट पुन्हा भाजपामध्ये जाऊन मिळाला. तर दुसरीकडे ज्या एकनाथ शिंदेंनी महानगरपालिकेमध्ये महाभारत घडवलं ते स्वतः भाजपसोबत एकत्र येऊन मुख्यमंत्री झाले. या सर्वांमध्ये आता काय करायचं हा प्रश्न काही बंडखोरांना पडला आणि शिंदेंना महानगरपालिकेमध्ये काही बंडखोर नगरसेवकांनी समर्थन दिले.

आता शिंदे गटातील काही नगरसेवकांनी (अजून आकडा निश्चित नाही) भाजपला आपला पाठिंबा जाहीर केला आहे. मात्र हा पाठिंबा जरी जाहीर केला असला तरी हे नगरसेवक पुन्हा भाजपमध्ये जाण्यास उत्सुक आहेत. याबाबतची चाचपणी ते करत आहेत. वेळोवेळी भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांना भेटत आहेत.

मात्र, या सर्व बंडखोर नगरसेवकांना पुन्हा भाजपमध्ये घेऊ नका. पक्षातून बंडखोरी करत या नगरसेवकांनी शिवसेनेला पाठिंबा दिला व शिवसेनेचा महापौर केला. मात्र या सगळ्यांमध्ये नुकसान पक्षाचे झाले आहे. अशावेळी या नगरसेवकांना माफ करू नका. यांना पक्षात घेऊ नका असं मत जळगाव शहर महानगरपालिकेतील मूळ भाजप मध्ये राहिलेल्या नगरसेवकांनी गिरीश महाजन यांच्यापुढे व्यक्त केल आहे.



author avatar
टीम जळगाव लाईव्ह