ऐन निवडणुकी तोंडावर भाजपची मोठी कारवाई; चार पदाधिकारी ६ वर्षांसाठी निलंबित

डिसेंबर 16, 2025 3:36 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । एकीकडे राज्यातील महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजलं असताना अशातच भाजपनं मोठी कारवाई केली. अकोला जिल्ह्यातल्या मूर्तिजापूरमधील चार पदाधिकाऱ्यांना ६ वर्षांसाठी निलंबित केले.पक्ष विरोधी भूमिका घेतल्यानं ही कारवाई करण्यात आली असून परिसरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली.

bjp

नगरपालिका निवडणुकीत उमेदवाराला पराभूत करण्यासाठी प्रयत्न केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवलाय. उमेदवारांच्या तक्रारीनंतर जिल्हाध्यक्षांनी ही कारवाई केली. उमेदवारांच्या तक्रारीनंतर भाजप जिल्हाध्यक्ष संतोष शिवरकर यांनी ही कारवाई केली.

Advertisements

निलंबित केलेल्या पदाधिकाऱ्यांचे नाव?

Advertisements

मूर्तिजापूर येथील भाजपचे मंडळ कार्यकारिणी उपाध्यक्ष कमलाकर गावंडे, भारतीय जनता युवा मोर्चाचे उपाध्यक्ष अमोल पिंपळे, भारतीय जनता युवा मोर्चाचे मंडळ अध्यक्ष श्रीकांत रामेकर, नमामी गंगे अभियान प्रमुख नितीन भटकर असे कारवाई करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांचे नाव आहे..

दरम्यान, मूर्तिजापूर नगरपालिका निवडणुकीत पक्षाच्या विचारांशी गद्दारी करण्यासह उमेदवाराला पराभूत करण्यासाठी प्रयत्न केल्याचा ठपका ठेवत पक्षातून हकालपट्टी झाली आहे… जिल्ह्यात या अगोदर देखील अकोट तालुक्यात काही पदाधिकाऱ्यांना पक्षातून निलंबित करण्यात आलं होत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Stories