जळगाव लाईव्ह न्यूज : 6 डिसेंबर 2023 : तीन राज्यांमध्ये भाजपच्या दणदणीत विजय मिळावीला आहे. त्यामुळे आता मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड येथे भाजपाचे सरकार येणार असून भाजपाचे जे 12 खासदार विधानसभा निवडणूक जिंकले आहेत. ते आता लोकसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा देणार आहेत. त्यांनी आज बुधवारी लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यामुळे तीन राज्यातील नव्या सरकारमध्ये नवीन मुख्यमंत्र्याचा चेहरा पाहयाला मिळणार का ? याची उत्सुकता निर्माण झाली आहे.
खासदार किरोरी लाल मीना, राज्यवर्धन सिंह राठौर, नरेंद्र सिंह तोमर, प्रल्हाद सिंह पटेल, राकेश सिंह, उदय प्रताप, रीती पाठक, अरुण साओ, गोमती साई आणि दिया कुमारी अशी या भाजप नेत्यांची नावे आहेत. यावेळच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने एकूण २१ खासदारांना उमेदवारी दिली होती. त्यापैकी 12 जणांनी विजयाची नोंद केली आहे. इतर 9 खासदार निवडणुकीत पराभूत झाले.
तर बाबा बालकनाथ आणि रेणुका सिंह यांनी अद्याप राजीनामे दिलेले नाहीत.पण ते आज लोकसभेत आले नाहीत. दोघेही लवकरच राजीनामा सादर करणार असल्याचे सांगितलं जातं आहे. यावेळच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने आपल्या अनेक खासदारांना मैदानात उतरवून सर्वांनाच चकित केले होते. भाजपची ही योजना कामी आली. भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी या खासदारांच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व पंतप्रधान मोदी, लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभेच्या अध्यक्षांसोबत केले. विधानसभा निवडणुकीत विजयी झालेल्या अशा खासदारांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जेपी नड्डा यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी राजीनामे सादर केले.
मध्य प्रदेशातील नरसिंगपूरमधून विधानसभा निवडणुकीत विजयी झालेले केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते प्रल्हाद सिंह पटेल यांनी लवकरच कॅबिनेट मंत्रिपदाचा राजीनामा देणार असल्याचे म्हटले आहे. मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर बाबा बालकनाथ सिंह आणि रेणुका सिंह यांनी अद्याप राजीनामा दिलेला नसल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. त्यांना राज्यसभेत ठेवण्याचा भाजपचा प्रयत्न असेल. हे दोन्ही खासदार मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत होते. राजस्थान आणि छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांसाठी ही नावे पुढे येत आहेत.