प्रवाशांसाठी खुशखबर! जळगावमार्गे या दोन शहरादरम्यान धावणार नवीन विशेष एक्स्प्रेस

डिसेंबर 8, 2025 10:52 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव मार्गे आणखी दोन विशेष गाड्या धावणार आहे. प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता रेल्वेकडून वलसाड-बिलासपूर व बिलासपुर-वलसाड या दोन विशेष एक्स्प्रेस चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या दोन्ही रेल्वेंना जळगाव थांबा असून, दोन्ही रेल्वेंच्या एकूण आठ फेऱ्या होणार आहेत. ख्रिसमस नाताळ आणि नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटन करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. या पार्श्वभूमीवर रेल्वे विभागाने हा निर्णय घेतला आहे.

train

०८२४४ वलसाड-बिलासपूर ही रेल्वे वलसाडे येथून प्रत्येक शुक्रवारी सायंकाळी ४.५० वाजता सुटेल. त्याच दिवशी रात्री ११.४० वाजता जळगावात थांबा घेऊन बिलासपूरसाठी रवाना होईल. ही रेल्वे १९ डिसेंबर ते ९ जानेवारीपर्यंत धावणार आहे. ०८२४३ बिलासपुर-वलसाड ही रेल्वे प्रत्येक गुरुवारी दुपारी ४ वाजता बिलासपूर येथून सुटेल. शुक्रवारी सकाळी ६.५८ वाजता जळगावात पोहोचेल. त्यानंतर वलसाडसाठी रवाना होईल.

ही रेल्वे १८ डिसेंबर ते ८ जानेवारीपर्यंत धावणार आहे. या दोन्ही रेल्वे जळगाव, भुसावळ स्थानकांवर थांबा घेणार आहे. या रेल्वेंना एसी २ टियर, एसी ३ टियर, स्लीपर क्लास आणि जनरल, सेकंड क्लास अशी संरचना असल्याचे सांगण्यात आले आहे.

या स्थानकांवर असेल थांबा?

ही गाडी दोन्ही दिशांना भेस्तान, चलठाण, नंदुरबार, अमळनेर, जळगाव, भुसावळ, मलकापूर, अकोला, बडनेरा, वर्धा, नागपूर, गोंदिया, डोंगरगड, राज नांदगाव, दुर्ग, रायपूर आणि भाटापारा स्थानकावर थांबेल.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now