---Advertisement---
महाराष्ट्र राजकारण

किरीट सोमय्यांची ‘ती’ जखम खरी की खोटी? मेडिकल रिपोर्टमधून मोठा खुलासा

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ एप्रिल २०२२ । गेल्या काही दिवसापूर्वी खार पोलिस स्थानकाबाहेर (Khar Police Station) भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यावर हल्ला करण्यात आला होता. त्यानंतर माध्यमांनी टिपलेल्या दृश्यांमध्ये किरीट सोमय्या यांच्या हनुवटीतून रक्त वाहत असल्याचं दिसून आलं होतं.शिवसैनिकांनी पोलिसांच्या मदतीने माझ्यावर प्राणघातक हल्ला केला, असा दावा करत सोमय्या यांनी थेट दिल्लीत धाव घेतली आणि केंद्रीय गृहसचिवांकडे या घटनेची चौकशी करण्याची मागणी केली.

kirit somayya jpg webp

मात्र, या हल्लाप्रकरणी आता मोठी बातमी समोर आलीय. किरीट सोमय्यांना किरकोळ जखम झाल्याचा अहवाल भाभा रुग्णालयाचा अहवाल दिला आहे. सोमय्यांना जखम झाल्यावर रक्तस्त्राव झाला नाही, असंही वैद्यकीय अहवालात (Medical Report) नमूद करण्यात आलंय. यामुळे आता महाविकास आघाडीकडून पुन्हा एकदा किरीट सोमय्या यांना लक्ष्य केलं जाण्याची शक्यता आहे.

---Advertisement---

काय होती घटना?

किरीट सोमय्या यांच्या गाडीवर शनिवारी खार पोलिस स्थानकाबाहेर दगडफेक करण्यात आली. यावेळी काच फुटल्यानंतर सोमय्या यांच्या हनुवटीला जखम झाली होती. माध्यमांनी टिपलेल्या दृश्यांमध्ये किरीट सोमय्या यांच्या हनुवटीतून रक्त वाहत असल्याचं देखील दिसून आलं होतं. दरम्यान, किरीट सोमय्यांची जखमी खरी आहे की खोटी, अशी शंका घेतली जात होती. त्यावर आता भाभा रुग्णालयानं दिलेल्या मेडिकल रिपोर्टनं मोठा खुलासा केलाय.

ही जखम ०.१ सेमीची होती, तसंच रक्तस्त्राव झाला नव्हता, असं वैद्यकीय तपासणीच्या अहवालात नमूद करण्यात आल्याचे समजते. हा अहवाल रुग्णालयाकडून मुंबई पोलिसांना देण्यात आल्याचीही माहिती आहे. त्यामुळे आता सोमय्यांच्या व्हिडीओमध्ये दिसत असणारी जखमी खोटी होती का, असा प्रश्न पुन्हा चर्चेत येण्याची शक्यता आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---