⁠ 
शुक्रवार, मे 17, 2024

गुजरात निवडणुकीत आ.राजुमामा भोळेंवर मोठी जबाबदारी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ नोव्हेंबर २०२२ । गुजरातमध्ये अवघ्या काही दिवसांनी विधानसभा निवडणूका होत असून जळगावचे आ. राजू मामा भोळे यांना मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. आज रविवारी आ. राजू मामा भोळे यांनी बारडोली येथे प्रभारी म्हणून असताना सरपंच महेंद्र भाई देसाई यांच्या घरी भेट दिली. दरम्यान, येणाऱ्या निवडणुकीसंदर्भात विविध महत्वाच्या मुद्यांवर चर्चा करण्यात आली.

गुजरातमध्ये यंदा 2 टप्प्यांमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. 1 आणि 5 डिसेंबर 2022 या दोन दिवशी मतदान होणार आहे. तर 8 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. त्यामुळे त्या त्या पक्षाचे नेते कामाला लागले असून जळगावचे आ. राजू मामा भोळे यांना देखील बिजीपी पक्षाने मोठी जबाबदारी दिली आहे. दरम्यान, आज रविवारी आ. राजू मामा बोळे यांनी बारडोली येथे प्रभारी म्हणून असताना सरपंच महेंद्र भाई देसाई यांच्या घरी भेट दिली. यावेळी येणाऱ्या निवडणुकीसंदर्भात विविध महत्वाच्या मुद्यांवर चर्चा झाली.

या प्रसंगी सह प्रभारी सचिन पानपाटील, देवेंद्र भाई, भोला भाई, वासुदेवभाई, राजू भाई, सरला बेन, वर्षा बेन, सुकदिप भाई, कैलास भाई, व अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.