महाराष्ट्रराजकारण
मोठी बातमी : प्रभाग समिती १ सभापती निवडणूक कार्यक्रम जाहीर
जळगाव लाईव्ह न्यूज । १५ एप्रिल २०२३ । महापालिकेच्या प्रभाग समिती १ मधील सभापती निवडणूक कार्यक्रम विभागीय आयुक्तांकडून मनपास प्राप्त झाला आहे. त्यानुसार प्रभाग समिती १ च्या सभापती निवडीसाठी २४ एप्रिल रोजी विशेष सभेचे सकाळी अकरा वाजता मनपा सभागृहात आयोजन केले आहे.
पिठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी अमन मित्तल राहणार आहे. त्यापूर्वी १७ ते १९ एप्रिल दरम्यान नामनिदेर्शऩ अर्ज घेण्यासाठी सकाळी अकरा ते दुपारी १ वाजेपर्यंत नगरसचिव कार्यालयात अर्ज मिळणार आहे. २० रोजी सकाळी अकरा ते दुपारी ३ पर्यंत अर्ज नगरसचिव कार्यालयात स्विकारले जातील. अर्ज छाननी, अर्ज मागे घेणे हे २४ रोजी होणार्या सभा सुरू झाल्यावर होणार आहे.