मोठी बातमी : दिग्गजांचा पत्ता कट करत आ. राजूमामा भोळे होणार कॅबिनेट मंत्री?
जळगाव लाईव्ह न्यूज । २९ जुलै २०२२ । शिवसेना – भारतीय जनता पक्षाचे सरकार महाराष्ट्रावर आले आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झाले आहेत. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाले आहेत. शिंदे यांच्या सरकारला आता एक महिना पूर्ण होत आला आहे. तरी देखील अजून मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. मात्र तो लवकरच होईल असा अंदाज आहे. या मंत्रिमंडळामध्ये दिगजांचा पत्ता कट होणार असे म्हटले जात आहे. मात्र जळगाव शहराचे आमदार राजूमामा भोळे यांना कॅबिनेट मंत्री पद मिळणार आहे. अशा प्रकारच्या पोस्ट व्हायरल होत आहेत.
ज्याप्रकारे गुजरात मध्ये गेल्या काही वर्षांपूर्वी मंत्रीपद विस्तारावेळी दिग्गजांचा पत्ता कट करून नवख्या किंबहुना कमी नाव असलेल्या आमदारांना मंत्रिपद दिले होते. त्याच प्रकारचे मंत्रीपद आता महाराष्ट्रातल्या आमदारांना देखील देण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे. याबाबतच्या कित्येक याद्या आतापर्यंत फेसबुकवर किंबहुना सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अशीच एक यादी आज सकाळपासून जळगाव शहरामध्ये व्हायरल होत आहे. या यादीनुसार जळगाव शहराचे आमदार राजूमामा भोळे यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळणार आहे.
काय म्हटले आहे पोस्ट मध्ये
दिग्गजांचा पत्ता कट. शिंदे सरकार मंत्री मंडळ विस्ताराचा मुहुर्त दोन दिवसात. येत्या दोन दिवसांत हे मंत्री घेतील जबाबदारी,,,,,दिल्ली वरुन डायरेक्ट फोन,…, हॅलो,, शपथविधी साठी करा तैयारी. कॅबिनेट मंत्री – मुख्यमंत्री, एकनाथराव शिंदे. उपमुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस,. राजेश पाडवी, काशिराम पावरा, सुरेश भोळे, मंगेश चव्हाण, श्वेता महाले, गोवर्धन शर्मा, दादाराव केचे, खोपडे, सुरेश खाडे, नितेश राणे, दीपक केसरकर, उदय सामंत, योगेश कदम, शंभुराजे देसाई, शहाजीबापु पाटील, तानाजी सावंत, भरत गोगावले, यामिनी जाधव, सदा सरवणकर, दिलीप लांडे, प्रताप सरनाईक
राज्यमंत्री – बालाजी किणीकर, दादा भुसे, सुहास कांदे, रमेश बोरनारे, संदीपान भुमरे, संतोष बांगट, संजय राठोड, किशोर पाटील, सुभाष देशमुख, सचिन शेट्टी, संभाजी पाटील निलंगेकर, लक्ष्मण पवार, नमिता मुंदडा, सुनिल कांबळे,प्रशांत ठाकूर, मंगलप्रभात लोढा.
पोस्टमध्ये म्हटल्या प्रमाणे, जळगाव शहराचे आमदार राजुमामा भोळे हे केबिनेट मंत्री होणार आहेत. राज्यात मंत्रिमंडळ विस्तार करताना गुजरात पॅटर्नचा उपयोग केला जाणार असल्याची शक्यता सूत्रांकडून व्यक्त केली जात आहे. राज्यात गुजरात पॅटर्नचा उपयोग केल्यास अनेक दिग्गजांचा पत्ता गुल होऊ शकतो.यामुळे जर हि पोस्ट खरी ठरली आणि आमदार भोळे केबिनेट मंत्री झाले तर हि जळगाव शहरातल्या नागरिकांसाठी पर्वणी ठरणार आहे.