⁠ 
सोमवार, मे 20, 2024

मोठी बातमी : सुरेशदादा जैन पुन्हा सक्रिय होणार!

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ ऑगस्ट २०२२ । जळगाव शहराचे माजी आमदार सुरेशदादा जैन पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय होऊ पाहत आहेत. अशा चर्चांना उधाण आले आहे. संपूर्ण जळगाव शहरांमध्ये याबाबतच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. जळगाव शहर महानगरपालिका आणि जळगाव शहर विधानसभा क्षेत्र यावर अंकुश ठेवण्यासाठी जळगाव शहराचे माजी आमदार सुरेशदादा जैन राजकारणात पुन्हा सक्रिय होत आहेत. अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू व्हायला सुरुवात झाली आहे. याबाबत अधिकृतरित्या कोणतीही घोषणा झाली नसली, तरी देखील राजकीय वर्तुळात या चर्चांना उधाण आले आहे.

शिवसेनेतून शिंदे गट वेगळा झाला असून जळगाव जिल्ह्यामध्ये शिवसेनेला खूप मोठा फटका बसला आहे. जळगाव जिल्ह्यातून शिंदे गटात तब्बल शिवसेनेचे पाच आमदार गेले आहेत. यामुळे मूळ शिवसेनेत आता जळगाव जिल्ह्यातला एकही आमदार शिल्लक राहिलेला नाही. अशावेळी हि सर्व गळती थांबवण्यासाठी आणि जळगाव जिल्ह्यावर शिवसेनेची मूठ बांधण्यासाठी पुन्हा एकदा माजी आमदार सुरेश दादा जैन सक्रिय होणार आहेत. अशा चर्चांना उधाण आले आहे.

मात्र दुसरीकडे, गेल्या अडीच वर्षांपासून महाराष्ट्रात शिवसेनेची सत्ता होती. मात्र सत्ता असतानाही सुरेशदारांना कुठलाही दिलासा मिळालेला नाही. अशावेळी सुरेश दादा देखील नाराज आहेत. यामुळे जळगाव शहरात येऊन किंबहुना जळगाव शहराच्या राजकारणात सक्रिय होऊन ते आपली भूमिका लवकरच समोर आणतील अशा देखील चर्चा सुरू आहे.

जळगाव शहर महानगरपालिकेमध्ये शिवसेनेच्या महापौर जयश्री महाजन आहेत. तर उपमहापौर कुलभूषण पाटील हे देखील शिवसेनेचेच आहेत. असे जरी असले तरी देखील येत्या काळात पक्षाला गळती लागू शकते असा अंदाज वर्तवला जात आहे . शिवसेना पक्ष मनापामध्ये शाबूत ठेवण्यासाठी व शिवसेनेतली गळती थांबवण्यासाठी सुरेश दादा पुन्हा राजकारणात सक्रिय होणार आहेत. असे देखील म्हटले जात आहे. मात्र याबाबत कोणत्याही प्रकारची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा नगरसेवक नितीन लढ्ढा यांच्याशी याबाबत चर्चा केली असला लढ्ढा यांनी सांगितले की, या केवळ चर्चा असून याबाबत असे काहीही ठरले नाहीये. अशा चर्चांवर कोणीही विश्वास ठेवू नये.