महाराष्ट्र
मोठी बातमी : १ मे पासून शिर्डी साईबाबा मंदिर राहणार बेमुदत बंद
जळगाव लाईव्ह न्यूज । २७ एप्रिल २०२३ । शिर्डीच्या साई मंदिराबाबत कोर्टाने दिलेल्या निकाला विरोधात १ मे पासून साई मंदिर बेमुदत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
करोडो भाविकांचे श्रद्धा स्थान असलेल्या शिर्डी मंदिरला वारंवार धमक्या येत आहेत. त्यामुळे शिर्डीतील साई मंदिराला महाराष्ट्र पोलीस, संस्थेचे सुरक्षा रक्षक, कंमाडो, बॉम्बशोधक पथकासह विविध प्रकारची सुरक्षा दिलेली आहे.मात्र साईबाबा संस्थानला केंद्रीय सुरक्षा पुरवण्यात यावी, अशी मागणी केली एका सामाजिक कार्यकर्त्याने केली होती व कोर्टात याचिका दाखल केली होती.
यावर कोर्टाच्या निर्देशानंतर साईबाबा संस्थानने केंद्रीय सुरक्षा लागू करण्यास तयारी दाखवलीय. मात्र शिर्डीतील नागरिकांनी या निर्णयास विरोध केला आहे. या अनुषंगाने येत्या १ मे पासून बेमुदत शिर्डी बंदची हाक दिली आहे.