जळगाव लाईव्ह न्यूज । २० जून २०२२ । विधानपरिषदेसाठी पहिल्या टप्प्याची मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या राजराजे निंबाळकर यांच्या कोट्यातील एक मत तर भाजपच्या उमा खापरे यांची मत बाद झाली आहेत. निवडणूक अधिकाऱ्यांनी हि मत बाद ठरवल्याने हि मत बाद झालेली आहेत. राष्ट्रवादीच्या मतावर भाजपकडून आक्षेप घेण्यात आला होता. तर भाजपच्या मतावर देखील आक्षेप घेण्यात आला. हा महाविकास आघाडीसाठी धक्का असल्याचं सांगितलं जात असतानाच भाजपचं मत घोक्यात आलं होत. आता हि मत बाद झाली आहेत.
नाथाभाऊंचा विजय असो, विधानभवनाबाहेर कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
विधान परिषद निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून अवघ्या काही वेळात निकाल समोर येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते एकनाथराव खडसे व महाविकास आघाडीसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे. दरम्यान, विधान भवनाबाहेर सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली आहे. खडसे समर्थकांनी नाथाभाऊ तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं। एकच भाऊ नाथाभाऊ.. अशी जोरदार घोषणाबाजी केली जात आहे.
विधान परिषद निवडणूक भाजप आणि महाविकास आघाडीने प्रतिष्ठेची करून ठेवली आहे. एकनाथराव खडसे यांच्या भोवती सर्व विधानपरिषदेचे राजकारण फिरत असून खडसे यांचा विजय होणार की नाही याकडे लक्ष लागून आहे. विधानपरिषद निवडणुकीच्या १० जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. सकाळपासून सुरू झालेली मतमोजणी दुपारी चार वाजता संपुष्टात आली. निवडणुकीचा हक्क बजावलेल्या सर्व २८५ आमदारांची मते वैध ठरवण्यात आली आहेत. काही वेळापूर्वी भाजपच्या २ मतांवर काँग्रेसने आक्षेप नोंदवला होता. दरम्यान, निवडणूक आयोगाने आक्षेप फेटाळून लावल्यानंतर मतमोजणीला सुरुवात झाली होती.
मतमोजणीला सुरुवात झाली असून रात्री नऊ वाजेपर्यंत निकाल हाती येण्याची शक्यता आहे. विधान भवनाबाहेर सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी करण्यास सुरुवात केली असून जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे. विधानभवनाबाहेर एकनाथराव खडसेंचे समर्थक मोठ्याप्रमाणात जमले असून जळगाव, खान्देश आणि पुण्याच्या समर्थकांचा समावेश आहे. नाथाभाऊंचा विजय असो अशी घोषणाबाजी सुरू असून विधानमंडळ बाहेर फलक देखील लागले आहेत.
कागदावरील आकडेमोडीत सोपी वाटणारी ही निवडणूक प्रत्यक्षात मात्र अवघड अशीच झाली. या निवडणुकीत राष्ट्रावादीचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे का काँग्रेसचे भाई जगताप असे चित्र रंगवले जात होते. कारण भाजपाकडून या दोन नेत्यांना लक्ष केले जाण्याची शक्यता होतीच व झालं हि तसच. खडसे हे फडणविसांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जातात. यामुळे खडसेंना विधान परिषेत येण्यापासून कसे रोखता येईल? यासाठी भाजपाने ताकद लावली आहे. मात्र एकनाथराव खडसे यांना भाजपकडून लक्ष्य केले जाण्याची शक्यता लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस खडसे यांचा कोटा वाढवून देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सकाळी ९ वाजता सुरु झालेली मतदानाची प्रक्रिया दुपारी ४ वाजेपर्यंत संपली. यावेळी सर्व आमदारांनी मतदान केल. विधानपरिषद निवडणुकीत सर्वांत मोठा मुद्दा गुप्त मतदानाचा होता. गुप्त मतदानामुळे क्रॅास वोटिंग होण्याची दाट शक्यता होती मात्र ती झाली कि नाही अजून समजले नाहीये. अर्थात भाजपा व महाविकास आघाडी दोघांनाही याचा सारखाच धोका होता आहे. महाविकास आघाडी एकत्र दिसत असली तरी या तिन्ही पक्षात अंतर्गत मतभेद आहेत. राज्यसभा निवडणुकीत याचे परिणाम दिसून आले. हेच गणित आता भाजपाला लागू होते. भाजपाची मोठी डोकंदूखी एकनाथराव खडसेंची आहेत. त्यांना क्रॉस वोटिंग झाल्यास ते सहज निवडून येतील, याची भीती भाजपाला सतावत आहे.