जळगाव लाईव्ह न्यूज । २१ जानेवारी २०२२ । जळगाव जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी जिल्ह्यात ५ फेब्रुवारी, २०२२ पर्यंत मुंबई पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ३७ चे पोटकलम (१) व (३) जारी करण्यात आले आहे. अपर जिल्हादंडाधिकारी राहुल पाटील यांनी याबाबत कळविले आहे.

शासनाच्या आदेशानुसार मनाई आदेश लागू केलेल्या कालावधीत पाच किंवा पाचपेक्षा जास्त लोकांचा जमाव करण्यास संबंधित स्थानिक पोलिस ठाण्याच्या पूर्व परवानगीशिवाय सभा घेण्यास किंवा मिरवणुका काढण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश शासकीय कार्यक्रम, प्रेतयात्रा यांना लागू राहणार नाही. असे अपर जिल्हादंडाधिकारी राहुल पाटील यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये कळविले आहे.

हे देखील वाचा :
- जळगावात वाहतूक पोलिसांची २४ अल्पवयीन चालकांवर कारवाई, सव्वा लाखांहून अधिकचा दंड
- गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्याचे ‘द इनव्हिजिबल फायर’ पुस्तक प्रकाशित
- डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी येथे जागतिक हिपॅटायटिस दिनानिमित्त व्याख्यान संपन्न
- भुसावळ नगरपालिकेत १ ऑगस्टपासून आरोग्य शिबीर
- सलग तिसऱ्या दिवशी सोने-चांदी स्वस्त; जळगाव सराफ बाजारातील आजचे दर पहा..








