मोठी बातमी : पाचोरा बाजार समितीवर किशोरआप्पांचा झेंडा !
जळगाव लाईव्ह न्यूज । २२ मे २०२३ । पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीवर पुन्हा किशोर अप्पांचा झेंडा फडकला आहे, कारण सभापती आणि उपसभापतींची निवड बिनविरोध झाली आहे. यात सभापतीपदी गणेश भीमराव पाटील तर उपसभापतीपदी पी. ए. पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
पाचोर्यात येथील कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक १८ जागांसाठी झाली. यात आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या पॅनलला नऊ जागा मिळाल्या होत्या. महाविकास आघाडीच्या पॅनलला सात तर दोन जागा अमोल शिंदे यांना मिळाल्या होत्या.
निवडणुकीच्या काळात खूप आरोप प्रत्यारोप झाले होते. त्रिशंकू स्थिती निर्माण झाली होती. यात सत्तेच्या जागा अमोल शिंदे यांच्याकडे असल्याचे मानले जात होते.
दरम्यान, आज येथील सभापती आणि उपसभापतीची निवड प्रक्रिया पार पडली. यात सभापतीपदी गणेश भीमराव पाटील तर उपसभापतीपदी पी. ए. पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. आणि पाचोरा बाजार समितीवर किशोरअप्पांचा झेंडा फडकला.