---Advertisement---
जळगाव शहर जळगाव जिल्हा

मोठी बातमी: जळगावचे रस्ते होणार चकाचक , 200 कोटींचा निधी मिळाला

girish mahajan
---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १० जानेवारी २०२३ । जळगाव शहरातील रस्त्यांची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. यावर तात्काळ तोडगा काढण्यात येणार असून येत्या सहा महिन्यात जळगाव शहरातले सर्व रस्ते हे चकाचक करण्यात येणार आहेत. अशी माहिती ‘जळगाव लाईव्ह’शी बोलताना मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. यासाठी 200 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

girish mahajan

यावेळी बोलताना मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, जळगाव शहराच्या रस्त्यांची अवस्था खरंच बिकट आहेत. नागरिक त्रस्त आहे. मात्र लवकरच म्हणजेच येत्या सहा महिन्यात जळगावचे रस्ते चकाचक होणार आहेत. खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासाठी 200 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. सुरुवातीच्या टप्प्यात शंभर कोटी रुपयांच्या निधी देण्यात येणार आहे. पुढील शंभर कोटी रुपयांचा निधी ही काम झाल्यावर देण्यात येणार असल्याची माहिती यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी जळगाव लाईव्हशी बोलताना दिली

---Advertisement---

त्याचबरोबर जळगावात असलेल्या घरकुला संदर्भात देखील बैठक घेण्यात आली. तोही विषय लवकरच मार्गी लागणार असल्याची माहिती त्यांनी दिली. मंत्रालयामध्ये याबाबत बैठक झाली होती. या बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , मंत्री गिरीश महाजन, आमदार राजूमामा भोळे, आमदार मंगेश चव्हाण, मनपा आयुक्त देविदास पवार व इतर अधिकारी उपस्थित होते.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---