---Advertisement---
जळगाव जिल्हा महाराष्ट्र राजकारण

मोठी बातमी : पाचोरा तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ ऑक्टोबर २०२२ । गेल्या दोन दिवसांपासून पाचोरा तालुक्यासह परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेला घास निसर्गाने हेरावुन घेतला आहे. झालेल्या नुकसानीचे रितसर पंचनामे करण्यात यावेत. म्हणून आज दि. २१ ऑक्टोबर रोजी येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत आ. किशोर पाटील यांनी ऑनलाईन पद्धतीने उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांचेशी संवाद साधत पंचनामे संदर्भात सुचना दिल्या.

farmer

बैठकीस उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रम बांदल, तहसिलदार कैलास चावडे, ता. कृषी अधिकारी आर. एन. जाधव, मा. जि. प. सदस्य पदमसिंग पाटील,, शिवसेना (शिंदे गटाचे) तालुका प्रमुख सुनील पाटील, पंढरीनाथ पाटील, शिवदास पाटील, प्रविण ब्राह्मणे, आमदारांचे स्वीय्य सहाय्यक राजेश पाटील सह पंचायत समिती कार्यालय, तहसिल कार्यालय व कृषी कार्यालयाचे अधिकारी, मंडळ अधिकारी उपस्थित होते.

---Advertisement---

पाचोरा तालुक्यात झालेल्या पावसाची नोंद अशी
» पाचोरा- ७५.०८ मि. मी., नांद्रा ६९.०८ मि. मी., नगरदेवळा २४.०३ मि. मी., गाळण – ३०.५ मि. मी., कुन्हाड – ४.५ मि. मी., पिंपळगाव (हरेश्वर ) – ६९.३ मि. मी. वरखेडी – ६७ .०८ मि.मी., दि. २१ ऑक्टोबर रोजी पाचोरा ६२.०० मि. मी., गाळण ५०.०० मि.मी. वरखेडी ४१.०० मि. मी., पिंपळगाव (हरेश्वर) ५.०० मि. मी., कुन्हाड ७.०० मि.मी. नव नगरदेवळा ० मि. मी. याप्रमाणे पाऊस पडला असुन टक्क्यांपेक्षा कमी नुकसानीचे करण्यात यावेत, अशी सूचना पाचोरा मतदारसंघाचे आमदार किशार पाटील यांनी मुंबई येथून ऑनलाईन पद्धतीने उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रम बांदल, तहसीलदार कैलास चावडे यांना दिल्या.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---