बातम्या

मोठी बातमी ! जिल्ह्यात ड्राेनद्वारे‎ मालमत्तांची माेजणी प्रक्रिया पूर्ण : ‘या’ तालुक्यांचा समावेश ‎

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १० जून २०२२ । जळगाव‎ जिल्ह्यात अनेक गावठाण जागा‎ आहेत. ज्यांच्या मालकी हक्कांची ‎ अधिकृत नाेंदच नाही. केंद्राच्या ‎ स्वामित्व हक्क याेजनेंतर्गत गेल्या‎ सहा महिन्यांपासून जिल्ह्यात‎ ड्राेनच्या मदतीने माेजणी करण्यात‎ येत आहे. त्यामुळे लाखाे‎ मालमत्तांना सनद मिळू शकणार‎ आहे. जिल्ह्यातील महसूल क्षेत्राची ‎माेजणी ब्रिटीश काळात १९१९ मध्ये ‎झाली हाेती. तेव्हा पहिला सिटी सर्व्हे ‎ ‎ झाला हाेता. त्यानंतर ३०-३५‎ वर्षांनंतरच मालमत्तांची माेजणी‎ झाली. ती देखील अर्धवटच झाली.‎ जिल्ह्यतील २७५ गावांची पारंपारिक‎ पध्दतीने माेजणी झाली.‎ केंद्र शासनाच्या स्वामित्व‎ ‎ याेजनेतंर्गत जिल्ह्यात डिसेंबर‎ २०२१पासून ड्राेनच्या माध्यमातून‎ मालमत्तांची माेजणी करण्यात येत‎ आहे. यात जिल्ह्यातील १५‎ तालुक्यातील ११५० महसुली‎ ‎ गावांतील मालमत्ता, शेतजमीन,‎ गावठाण जमिन यांची माेजणी‎ ड्राेनच्या सहाय्याने केली जात आहे.‎ आतापर्यंत यावल, भुसावळ,‎ पाचाेरा, चाळीसगाव, भडगाव,‎ ‎ पाराेळा या सहा तालुक्यांची माेजणी‎ पूर्ण झाली असून अमळनेर‎ तालुक्याची माेजणी अंतिम टप्प्यात‎ आहे . सात तालुक्यांतील ६१६‎ गांवाची माेजणी पूर्ण झाली आहे.‎

असा हाेईल फायदा‎ ड्राेनच्या मदतीने अत्याधुनिक पद्धतीने हाेत असलेल्या‎ माेजणीमुळे प्रत्येक गावातील घर, शेत, गावठाण जमीन‎ यांची माेजणी केली जाणार आहे. त्यामुळे ज्या‎ मालमत्तांची महसूल दरबारी नाेंदच नाही अशा‎ मालमत्तांची नाेंदणी हाेईल. प्रत्येक मालमत्तेचा मालकी‎ हक्क निश्चित हाेईल. त्यामुळे लाखाेंच्या संख्येने‎ गावठाण जमिनीची कागदपत्र, सातबारा उतारे नसल्याने‎ त्या जागांवर घर व इतर व्यावसायिक बांधकाम‎ करण्यासाठी बँकांकडून कर्ज मिळण्यास अडचणी‎ येतात ही अडचण दूर हाेईल. शासनाच्या गावपातळीवर‎ असलेल्या सरकारी जागांची नाेंद झाली आहे.‎

अाॅनलाइन उपलब्ध असेल प्राॅपर्टी कार्ड‎ ड्राेनद्वारे माेजणी झाल्यानंतर नकाशा तयार करण्याचे‎ काम सुरु अाहे. त्यानंतर भूमिअभिलेख विभागातर्फे‎ प्रत्यक्ष जागेवर जावून चाैकशी करून मालकी हक्काची‎ खात्री करून निश्चित केला जाणार अाहे. एकदा‎ मालमत्तेचा मालकी हक्क निश्चित झाल्यावर‎ मालमत्ताधारकाला भूमिअभिलेख विभागाकडून सनद‎ दिली जाणार आहे. या सनदीवर मालमत्तेचे क्षेत्र,‎ जागेचा नकाशा, मालमत्ताधारकांच्या नावांचा समावेश‎ असेल. विशेष म्हणजे आधारकार्ड प्रमाणे संबधितांना‎ ही सनद ऑनलाइन उपलब्ध हाेईल, असे जिल्हा‎ भूमिअभिलेख अधिकारी एम. एस मगर यांनी सांगितले.‎

Related Articles

Back to top button