---Advertisement---
गुन्हे धरणगाव

मोठी बातमी : धरणगावचे माजी नगराध्यक्ष निलेश चौधरी यांच्यासह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ सप्टेंबर २०२२  धरणगावचे माजी नगराध्यक्ष निलेश चौधरी यांच्यासह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेत जमिनीच्या नोंदीत फेरफार केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

nilesh chaudhari

अधिक महिती अशी कि, जयंत पुंडलिक भट्ट (महसूल, नायब तहसील) यांनी धरणगाव पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार शेत जमिनीत फेरफार केल्याप्रकरणी भरतसिंग देविदास परदेशी (नाशिक), निलेश सुरेश चौधरी (माजी नगराध्यक्ष, धरणगाव), वनराज बुधा पाटील (तत्कलीन मंडळ अधिकारी,साळवा), रोशनी मोरे (तत्कालीन तलाठी नांदेड) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

---Advertisement---

याबाबत देविदास रामदास रडे (रा.नांदेड) यांनी तक्रार दिली होती. त्यानुसार धरणगाव गट क्षेत्र आहे आर या शेतजमिनीवर इतर कोर्टाचे आदेश नसतांना सदर जमीन फेरफार करण्यात आला. याबाबत महसूलने अहवाल सादर केलेला असून स्थानिक स्वराज संस्था यांना अधिकार नसतांना त्यांनी कोणत्या अधिकारात दाखला दिला. तसेच पदाचा दुरुऊपयोग करून हा दाखला संबंधित व्यक्तीने दिल्याचा आरोप आहे. नियमबाह्य नोंदी करण्यासाठी बेकायदेशीर कागदपत्र तयार करून शासनाची फसवणूक करणे, यासह ४९ वर्षानंतर वारस नोंद मंजूर करणे, चुकीच्या नोंदीवरून नोंद खारीज करण्याचेही अधिकार असतानाही नोंद मंजूर करणे, चुकीची नोंद पडताळून न बघणे, प्रशासकीय गोष्टीकडे दुर्लक्ष करणे, चुकीचा दस्त देणे, चुकीचा दस्त देत शासनाची फसवणूक करणे, यासारखे गंभीर आरोप फिर्यादीत आहेत. पुढील तपास पीएसआय गुंजाळ हे करीत आहेत.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---