Big Breaking : मुख्यमंत्र्यांच्या वाहनातून मंत्री आदित्य ठाकरेंना उतरवण्याचा प्रयत्न, मोदींचे करणार होते स्वागत
जळगाव लाईव्ह न्यूज । १४ जून २०२२ । देहू (पुणे) येथील संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा संपन्न झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई येथील शिक्रा पाँइंटवर दाखल झाल्यानंतर त्यांच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे पोहचले. मात्र, आदित्य ठाकरे यांना पंतप्रधानांच्या सुरक्षेचा प्रोटोकॉलच्या नावाखाली आदित्य ठाकरे यांना गाडीतून उतरवण्याचा प्रयत्न सुरक्षा यंत्रणांनी केला. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सुरक्षा यंत्रणांवर भडकले. मुंबईत अचानक घडलेल्या या प्रकारावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लागलीच संताप व्यक्त केला आहे.
देहू (पुणे) येथील संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंगळवारी संपन्न झाला. देहू येथील कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील विविध धार्मिक स्थळांच्या विकासाची माहिती संगतीतली. तसेच देहूतील श्री संत जगद्गुरू तुकाराम महाराज व वारकरी सांप्रदायातील संतांचे महत्त्व व त्यांनी केलेल्या कार्याविषयी गौरवोद्गार काढले. तसेच विकासकामांबद्दल बोलताना म्हणाले की, योग्य दिशेने प्रयत्न केले तर असंभवही संभव होऊ शकेल. सरकार गरिबांसाठी योजना राबवते आहे. 100 ट्क्कयांपर्यंत त्या पोहचावयच्या आहेत, असे ते म्हणाले. तसेच त्यांनी आपल्या भाषणात अनेक अभंगांच्या पंगतीचाही उल्लेख केला. त्यात श्री विठ्ठलाय नम, नमो सद्गुरु तुक्या ज्ञानदिपा.. नमो सद्गुरू सच्चिदानंद रूप.. नमोसद्गुरू भक्त कल्याण मूर्ती.. नमो सदगुरु भास्करापूर्ण कीर्ती, ज्ञानमूर्ती.,धन्य देहूगाव पुण्यभूमी ठाव । तेथे नांदे देव पांडुरंग ।। धन्य क्षेत्रवासी लोक ते देवाचे । उच्चारिती नामघोष ।।., अश्या विविध अभांगाचा उल्लेख केला.
देहू येथील कार्यक्रम आटोपल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी शिक्रा पॉईंटला पोहचले. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज शिष्ठाचार मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह पंतप्रधानांचे स्वागत करण्यासाठी गेले होते. केंद्रीय सुरक्षा यंत्रणांनी मंत्री आदित्य ठाकरे यांना वाहनातून उतरविण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्र्यांनी यावर संताप व्यक्त करीत आदित्य ठाकरे हे हे राजशिष्ठाचार मंत्रीही आहेत, त्यामुळे ते तिथे उपस्थित राहणे अपेक्षित होते, पंतप्रधानांच्या स्वागतासाठी बऱ्याचदा मुख्यमंत्री जात नाहीत, अशा वेळी आदित्य ठाकरे राजशिष्ठाचार मंत्री म्हणून स्वागतासाठी जातात. दरम्यान, सदर गळलेल्या प्रकारामुळे राज्यभरात प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे.