भुसावळ-पुणे गाडी २८ ऑक्टोबरपर्यंत ‘या’ स्थानकापर्यंतच धावणार
जळगाव लाईव्ह न्यूज । ६ ऑगस्ट २०२१ । प्रवाशांच्या सोयीसाठी कोरोनाकाळात रेल्वेतर्फे भुसावळ-पुणे दरम्यान विशेष गाडी सुरू करण्यात आली होती. मात्र, अचानक ही गाडी २७ मे ते २९ जुलै या दरम्यान दौडपर्यंतच धावणार असल्याचे जाहीर करण्यात आले. मात्र, २९ जुलै उलटल्यावर ही गाडी पुन्हा २८ ऑक्टोबरपर्यंत दौंड स्थानकापर्यंतच धावणार असल्याचे रेल्वे प्रशासनातर्फे जाहीर करण्यात आले.
२९ जुलैनंतर तरी ही गाडी पुण्यापर्यंत धावेल, अशी प्रवाशांना आशा होती. मात्र, ऑक्टोबरपर्यंत ही गाडी दौड स्थानकापर्यंतच धावणार असल्याने पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांची अधिकच गैरसोय होत आहे.
दुसऱ्या लाटेनंतर शासनाने अनलॉक केल्यानंतर रेल्वे प्रशासनाने अजूनही पॅसेंजर गाड्या सुरू केलेल्या नाहीत. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांचे हाल हात आहेत. प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने पॅसेंजर सुरू न करता भुसावळ ते पुणे या दरम्यान विशेष गाडी सुरू केली. ही गाडी सुरुवातीला एकदा व टप्प्या-टप्प्याने नियमित सुरू करण्यात येणार असल्याचे रेल्वेने सांगितले. मात्र, पुढे या गाडीचे तांत्रिक कारण सांगत ही गाडी अचानक २७ मे २०२१ पासून जुलैपर्यंत दौंडपर्यंतच धावणार आहे.