⁠ 
मंगळवार, एप्रिल 23, 2024

भुसावळ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत ‘या’ पदांसाठी होणार भरती

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । भुसावळ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिल्प निदेशक पदासाठी भरती करण्यात येणार आहे. सत्र २०२३-२४ या शैक्षणिक सत्रासाठी अभ्यागत शिक्षकांच्या तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती करण्यासाठी भरती करण्यात येणार आहे. यासाठी २८ जुलै पर्यंत अर्ज सादर करावयाचे आहे. असे भुसावळ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे सांगितले आहे.

ही पदे भरली जाणार?
क्राफ्ट इन्स्ट्रक्चर-वेल्डर-१, क्राफ्ट इन्स्ट्रक्चर सिट मेटल वर्कर- २, क्राफ्ट इन्स्ट्रक्चर कोपा- १, क्राफ्ट इन्स्ट्रक्चर टर्नर- १, क्राफ्ट इन्स्ट्रक्चर फिटर- १, क्राफ्ट इन्स्ट्रक्चर इलेक्ट्रशियन- ०३, क्राफ्ट इन्स्ट्रक्चर वायरमन- ०३, गणित आणि ड्राईग इन्स्ट्रक्चर- ०१, एम्प्लोबिलिटी स्किल- ०२, अशा पदांसाठी भरती केली जाणार आहे.

पात्रता काय :
शैक्षणिक पात्रता ही डायरेक्टोरेट जनरल ऑफ ट्रेनिंगने मान्यता दिलेल्या अभ्यासक्रमातील संबंधित व्यवसायाच्या ट्रेडनुसार आवश्यक असणार आहे. उमेदवारांनी आपले अर्ज सर्व प्रमाणपत्रांसह साक्षांकित केलेल्या प्रतीसह २८ जुलैपर्यंत संस्थेच्या कार्यालयात जमा करावयाचे आहे.

मुलाखतीची दिनांक आणि वेळ मोबाईलद्वारे कळवण्यात येणार आहे. त्यामुळे, अर्जावर उमदेवाराचा स्वतःचा मोबाइल नंबर असणे बंधनकारक आहे.