जळगाव लाईव्ह न्यूज । ११ फेब्रुवारी २०२२ । पारोळा तालुक्यात चोरट्यांनी उच्छाद मांडला आहे. तालुक्यातील भिलाली येथील मंदिराची दानपेटी व पाच घरे चोरट्यांनी फोडून तीन लाखाचा मुद्देमाल लांबविल्याची घटना ९ रोजी रात्री घडलीय. दरम्यान, चोरी करताना चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. या घटनांमुळे परिसरात नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे.
याबाबत कुणाल पाटील यांनी पारोळा पोलिसात फिर्याद दिली. ९ रोजी मध्यरात्री विशाल पाटील, लोटन पाटील, रवींद्र पाटील, शंकर पाटील यांच्या घरांसह संत सोनगीर महाराज मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी फोडली. त्यात रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा एकूण २ लाख ८३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. विशेष म्हणजे मंदिर परिसरातील सीसीटीव्ही तीन चोरटे कैद झाले आहे.
पोलिसांनी श्वान पथक व ठसे तज्ञांना पाचारण केले. मात्र, ठोस माहिती मिळाली नाही. सहा महिन्यांपुर्वी ग्रामीण भागात पशुधन चोरीच्या घटना घडल्या होत्या. त्यांचा उलगडा होत नसताना आता चार दिवसांत तालुक्यात १० घरफोड्या झाल्या आहेत. त्यामुळे चोरट्यांनी एकप्रकारे पोलिसांना आव्हान दिले अाहे.
हे देखील वाचा :
- जळगाव ग्रामीणमध्ये गुलाबराव पाटीलांचा पुन्हा विजय ; विरोधकांना चारली धूळ
- जळगाव शहरातून राजूमामा भोळे यांची विजयी हॅट्रिक
- महाराष्ट्र्रात पुन्हा महायुतीचे सरकार; ‘या’ 5 मुद्द्यांमुळे मिळाला विजय..
- जळगाव जिल्ह्यात मविआला धोबीपछाड! सर्वच ११ जागांवर महायुतीचा विजय निश्चित
- महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचं सरकार? मविआ सर्वात मोठा धक्का, आताची आकडेवारी वाचा