⁠ 
शनिवार, मे 18, 2024

अभियांत्रिकी व तंत्रज्ञान उपकार्यबल गटाच्या सदस्यपदी भरतदादा अमळकर

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज | १८ ऑगस्ट २०२३ | राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंमलबजावणीसाठी महाराष्ट्रात सूकाणू समिती अंतर्गत ११ तज्ज्ञांची अभियांत्रिकी व तंत्रज्ञान उपकार्यबल गट गठीत करण्यात आला आहे. या गटात केशवस्मृती सेवासंस्था समूहाचे प्रमुख तसेच प्रतिथयश उद्योजक भरतदादा अमळकर यांची सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. ही समिती राज्यातील अभियांत्रिकी /तंत्रज्ञान संस्थांच्या गुणवत्तावाढीसाठी काम करणार आहे.

उपकार्यबल गटातील सदस्य

डॉ. आर. डी. कुलकर्णी, कुलगुरु, मुंबई विद्यापीठ, मुंबई – अध्यक्ष
प्रा. विलास सपकाळ, कुलगुरु, एमजीएम विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर – सदस्य
प्रा. फारुक काझी, विभागप्रमुख, व्हीजेटीआय, मुंबई – सदस्य
प्रा. संजय नलबलवार, प्राध्यापक डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे रायगड – सदस्य
प्रा. श्रीरंग जोशी, विभागप्रमुख, फार्मासिटीकल्स सायन्स अॅन्ड टेक्नॉलॉजी, आयसीटी, मुंबई – सदस्य
प्रा.वाय.व्ही जोशी, प्राध्यापक एस.जी.जी.एस अभियांत्रिकी व तंत्रज्ञान संस्था, नांदेड – सदस्य
प्रा. सचिन उंटवाले, संचालक, रायसोनी इन्स्टिटयुट, नागपूर – सदस्य
डॉ. बी. एन. चौधरी, प्राचार्य, एसपीआयटी, मुंबई – सदस्य
भरत अमळकर, उद्योजक, जळगाव – सदस्य
महेश दाबक, उद्योजक, नाशिक – सदस्य
डॉ. विनोद मोहितकर, संचालक, तंत्र शिक्षण, मुंबई – सदस्य सचिव

काय असेल या उपकार्यबल गटाची कार्यकक्षा

उपकार्यबल गटाने आवश्यकतेनुसार बैठका घेऊन स्वायत्त अभियांत्रिकी संस्थांना संदर्भिय शासन निर्णयामधील तरतूदीच्या अनुषंगाने मार्गदर्शन (Mentoring) करावे.
उपकार्यबल गटाने तरतूदी शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून सर्व अभियांत्रिकी /तंत्रज्ञान संस्थांना लागू करण्याच्या अनुषंगाने संबंधित विद्यापीठांना मार्गदर्शन करावे आणि अनुषंगिक बाबींची पुर्तता करावी.
शासकीय/अनुदानित/विनाअनुदानित स्वायत्त संस्थांकडून वेळोवेळी अहवाल मागवून तो सुकाणू समितीस सादर करावा.