---Advertisement---
जळगाव शहर

जळगावच्या भानुदास विसावे यांची कुस्तीत सुवर्णपदकाला गवसणी

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ फेब्रुवारी २०२३ । महावितरणच्या राज्यस्तरीय आंतरपरिमंडलीय क्रीडा स्पर्धेत जळगाव-नाशिक परिमंडलाचे तंत्रज्ञ पैलवान भानुदास विसावे यांनी १०० ते १२५ किलो वजनी गटाच्या कुस्तीत कोल्हापूर परिमंडलाच्या पैलवानाला चीत करीत सुवर्णपदकाला गवसणी घातली.

kusti jpg webp webp


एकलव्य क्रीडा संकुलावर सुरू असलेल्या महावितरणच्या विविध क्रीडा प्रकाराच्या राज्यस्तरीय स्पर्धेत एक हजाराहून अधिक खेळाडूंनी सहभाग नोंदवला आहे. शुक्रवारी (दि.३) झालेल्या कुस्तीच्या स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडल्या. यावेळी सहव्यवस्थापकीय संचालक डॉ.मंगेश गोंदावले, मुख्य अभियंता कैलास हुमणे, भुजंग खंदारे, परेश भागवत, मुख्य जनसंपर्क अधिकारी अनिल कांबळे, सहमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी ललित गायकवाड यांच्यासह जळगावचे कुस्तीप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने स्पर्धा पाहण्यासाठी गर्दी केली होती. विविध गटांत कुस्ती स्पर्धा रंगली. यात जळगाव-नाशिक परिमंडलाचे पैलवान भानुदास विसावे यांनी १०० ते १२५ किलो वजनी गटात कोल्हापूर परिमंडलाच्या खेळाडूस अस्मान दाखवत सुवर्णपदक पटकावले.

---Advertisement---

त्याचबरोबर २०० मीटर धावणे स्पर्धेत नागपूर-गोंदिया-चंद्रपूर परिमंडलाच्या सरिता सोरटे या धावपटूने महिला गटात प्रथम क्रमांक पटकावला. तर पुरुष गटाच्या २०० मीटर धावणे स्पर्धेत पुणे-बारामती परिमंडलाच्या गुलाबसिंग वसावे याने प्रथम क्रमांक पटकावला. ४०० व ८०० मीटरच्या स्पर्धेमध्ये महिला गटात नांदेड-लातूर-औरंगाबाद परिमंडलाच्या श्वेतांबरी अंबादे हिने प्रथम क्रमांक पटकावला. तसेच पाच हजार मीटर धावण्याच्या स्पर्धेत कल्याण-रत्नागिरी परिमंडलाच्या प्रफुल्ल राऊत याने सुवर्णपदक पटकावले.
सर्व विजेत्या स्पर्धकांचे क्रीडा स्पर्धेचे यजमान जळगाव परिमंडलाचे मुख्य अभियंता कैलास हुमणे यांनी अभिनंदन केले.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---