जळगाव लाईव्ह न्यूज । ११ ऑक्टोबर २०२२ । एरंडोल तालुका विधी सेवा समिती व तालुका वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आज भालगाव येथे राष्ट्रीय बालिका दिन आणि जागतिक मानसिक आरोग्य दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा विधी सेवा समितीचे सचिव ए.के.शेख हे होते.
ऍड.ए.के. शेख न्यायमूर्ती विशाल धोंडगे, ऍड. ज्ञानेश्वर महाजन यांची समायोचीत भाषणे झाली. न्यायमूर्ती बी.ए.तळेकर या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. याप्रसंगी १०० शालेय विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्य वितरण करण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी सरकारी अभियोग्यता डी. बी. वळवी, एरंडोल वकील संघाचे अध्यक्ष एडवोकेट एम. ओ. काबरे, एडवोकेट डी एस पाटील, एडवोकेट प्रतिभा पाटील, एडवोकेट वासुदेव वारे, एडवोकेट प्रेमराज पाटील, एडवोकेट शेखर खैरनार, मायाताई कैलास पारधी ( भालगाव सरपंच ), सहाय्यक अधीक्षक ए. एन. पाटील इतर विधीज्ञ, कर्मचारी, शालेय विद्यार्थी, पो कॉ. धर्मेंद्र ठाकूर हे उपस्थित होते.