---Advertisement---
जळगाव जिल्हा प्रशासन

रेल्वेतून प्रवास करणाऱ्या फुकट्यांनो सावधान : ७५ तिकीट तपासनिसांचे पथक तयार

---Advertisement---

railway jpg webp

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ मे २०२२ । रेल्वेमध्ये वाढलेल्या गर्दीचा फायदा घेत राज्यातील व देशातील कित्येक फुकटे प्रवासी रेल्वेतून प्रवास करतात. या फुकट्यांवर अंकुश ठेवण्यासाठी भुसावळ विभागात तिकीट तपासणीची विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यासाठी ७५ तिकीट तपासनिसांचे पथक तयार केले आहे.त्यांना दररोज एकूण ३० लाख रुपये दंड वसुलीचे उद्दिष्ट दिले आहे.

---Advertisement---

लग्नसराई, उन्हाळी सुटीमुळे रेल्वे गाड्यांची गर्दी वाढली आहे. त्यात अनेक जण विनातिकीट, आरक्षण नसताना आरक्षित डब्यातून प्रवास, स्लीपर कोचचे आरक्षण असताना एसी डब्यातून प्रवास करतात. काही प्रवासी क्षमतेपेक्षा जास्त लगेज सोबत बाळगतात. यामुळे रेल्वेचे नुकसान होते. शिवाय नियमानुसार तिकीट काढून, आरक्षण करून प्रवास करणाऱ्यांना त्रास होतो. याबाबत ओरड वाढल्याने डीआरएम एस.एस.केडिया, वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक शिवराज मानसपुरे यांनी भुसावळ विभागात १ मे पासून कारवाई सुरू केली. त्यासाठी ७५ तिकीट तपासणीसाठी एक स्वतंत्र पथक नेमले. भुसावळातून खंडवा, बडनेरा, मनमाड मार्गावर हे पथक विविध स्थानके, धावत्या मेल, एक्स्प्रेस गाड्यांमध्ये अचानक तिकीट तपासणी करते. त्यात नियमबाह्य प्रवास करणाऱ्यांकडून दंड वसूल केला जातो.

सिनियर डीसीएम शिवराज मानसपुरे यांनी शुक्रवारी महाराष्ट्र एक्स्प्रेसमध्ये भुसावळ ते बडनेरा दरम्यान स्वत: प्रवाशांकडील तिकिट तपासणी केली. सहा तिकीट तपासणीस मदतीला हाेते. विनातिकीट व नियमबाह्य प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाईचे आदेश सिनियर डीसीएम शिवराज मानसपुरे यांनी यावेळी पथकाला दिले. महाराष्ट्र एक्स्प्रेसमध्ये तपासणी करताना सीनियर डीसीएम मानसपुरे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---