⁠ 
गुरूवार, मे 23, 2024

सावधान! व्हाट्सअँपवर मिळाली नोकरीची ऑफर; आमिष देऊन केली ३७ लाखांची फसवणूक

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज। ३१ जुलै २०२३। सायबर गुन्हेगार नवनवीन मार्गाने सर्वसामान्य लोकांची आर्थिक फसवणूक करतात. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियाच्या माध्यमातून नोकरीची ऑफर देऊन फसवणूक केली जात आहे. अशातच, ऑनलाइन फसवणुकीचे एक नवीन प्रकरण समोर आले आहे, ज्यात एका व्यक्तीला व्हॉट्सअॅप मेसेज पाठवून दररोज २-३ हजार रुपये कमावण्याची ऑफर देण्यात आली. त्यातूनच त्याच्या खात्यातून 37 लाख रुपये काढण्यात आले.

ठाण्यात राहणाऱ्या एका व्यक्तीचा सध्याचा जॉब कॉन्ट्रॅक्ट लवकरच संपणार आहे, त्यानंतर त्याने ऑनलाइन रिक्रूटमेंट पोर्टलवर आपला बायोडाटा शेअर केला आहे. यानंतर त्या व्यक्तीला इन्स्टंट मेसेजिंग अॅपवर एका अनोळखी नंबरवरून मेसेज आला. या मेसेजमध्ये नवीन नोकरीची ऑफर होती आणि ही नोकरी अर्धवेळ होती. ९० हजार रुपयांपर्यंत कमावण्याची ऑफर त्या व्यक्तीला देण्यात आली.

अर्धवेळ नोकरीत दररोज २,००० ते ३,००० रुपये कमावण्याची संधी मिळेल. तसेच एका महिन्यात ९०,००० रुपयांपर्यंत कमवू शकता, असे आमिष दाखवण्यात आले. गुन्हेगाराने व्यक्तीला सांगितले की, पार्ट टाइम जॉबमध्ये इंस्टाग्रामवर सेलिब्रिटींचे फोटो लाईक करावे लागतील. एका लाईकवर 70 रुपये दिले जातील. यासाठी प्रत्येक लाईकचे स्क्रीनशॉट शेअर करावे लागतील. विश्वास जिंकण्यासाठी, व्यक्तीला 210 रुपये दिले गेल

यानंतर व्यक्तीला टेलिग्राम ग्रुपमध्ये जोडण्यात आले. जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवून क्रिप्टोकरन्सी खरेदी करण्यास सांगितले. सुरुवातीला ९,००० रुपये गुंतवले आणि ९,९८० रुपयांचा परतावा मिळाला. विश्वासात घेतल्यानंतर व्यक्तीला आणखी पैसे ठेवले. त्यानंतर त्याला आणखी पैसे गुंतवण्यास सांगितले.

यानंतर व्यक्तीने सुमारे ३७ लाख रुपये गुंतवले. यानंतर घोटाळेबाजांनी कोणताही परतावा दिला नाही. यानंतर त्याला फसवणूक झाल्याचे कळले. याप्रकरणी पीडित व्यक्तीने पोलिसांत तक्रार केली आहे.