⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

सावदा येथे आवास योजनेच्या लाभार्थीना त्वरीत लाभाची रक्कम मिळावी ; शिवसेनेतर्फे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ ऑक्टोबर २०२१ ।  सावदा येथील अनेक नागरिकांनी पंतप्रधान आवास योजने अंतर्गत अर्ज केले होते यात ज्यांची नावे डी. पी.आर. मंजूर होऊन आली त्या नागरिकांनी आपली घरे बांधली, यात काहिनी हात उसनवारी करून, उधार वा कर्ज काढून बांधकाम पूर्ण, केले तर काहिनीचे बांधकाम लाभाची रक्कम पूर्ण मिळाली नसल्याने अपूर्ण असून सदर नागरीक भाडयाचे घरात राहत आहे.

या नागरिकांना मंजूर लाभाची रक्कम मिळत नसल्याने व घर बांधकाम सुरु असल्याने वा पूर्ण करून झाले तरी मिळत नसल्याने ही लाभाची रक्कम त्वरीत मिळावी अश्या मागणीचे निवेदन आज 4 रोजी सकाळी सावदा शहर शिवसेनेतर्फे नगर पालिका मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांना देण्यात आले.

यावेळी शेवसेना उपतालुका प्रमुख धनंजय चौधरी, शिवसेना शहर प्रमुख सूरज परदेशी, भरत नेहेते, तसेच रा.कॉ. नगरसेवक सिद्धार्थ बड़गे, रा.कॉ. महिला शहराध्यक्षा कल्पना ठोसरे, शिवसेना उपशहर प्रमुख गौरव भैरव, संघटक नीलेश खाचणे, शरद भारंबे, युवा सेना शहर प्रमुख, मनीष भंगाळे, गणेश माळी, शेख, चांद शेख शब्बीर, शेख नाजीम, हसन तडवी, नितिन सपकाळे, चेतन माळी, आदी उपस्थित होते.

दरम्यान दोन दिवस आधी सावदा शहरातील निमजाय माता मंदिराच्या समितीने मुक्ताई नगर मतदारसंघाचे आ. चंद्रकांत भाऊ पाटील यांना निवेदन देऊन त्या ठिकाणी रस्ता व स्ट्रीट लाईटची मागणी केली होती. कार्यतत्पर आमदारांनी लगेच रस्ता करण्यास संदर्भातल्या सूचना दिल्या व आज प्रत्यक्ष कामाला नारळ वाढवून सुरुवात करण्यात आली. त्याप्रसंगी उपस्थित शिवसेना उपतालुका प्रमुख धनंजय चौधरी, शहरप्रमुख सुरज परदेशी, भरत नेहते, अतुल नेमाडे, गौरव भैरवा, निलेश खाजणे, एड.धनंजय चौधरी, सचिन बराटे, मनीष भंगाळे, गणेश माळी, तिमा नेमाडे, ईश्वर नेमाडे, रितेश वारके आदी उपस्थित होते.