⁠ 
[rank_math_breadcrumb]

शरद पवार पक्षाच्या वतीने मुक्ताईनगर मतदारसंघात संवाद दौऱ्याचे आयोजन

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ ऑक्टोबर २०२४ । मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघ निवडणूक 2024 च्या पाश्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्राच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, महाविकास आघाडीचे ध्येय धोरणे, विकास कामे मतदारांपर्यंत पोहचवून मतदारांसोबत संवाद साधण्यासाठी गाव भेट संवाद दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

बोदवड तालुक्यातील गाव भेट संवाद दौऱ्याचा शुभारंभ शिरसाळा येथे श्री सिद्धेश्वर हनुमानजींचे दर्शन घेऊन पक्षाचे जेष्ठ नेते रविंद्र भैय्यासाहेब पाटिल आणि राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आला. यानंतर रविंद्र भैय्या पाटिल, रोहिणी खडसे आणि पदाधिकाऱ्यांनी शिरसाळा, चिंचखेडा सिम, कोल्हाडी, हिंगणे, आमदगाव आणि बोदवड शहरातील विविध प्रभागात भेटी देऊन ग्रामस्थ नागरिकांशी संवाद साधला त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. याप्रसंगी उपस्थितांशी संवाद साधताना जेष्ठ नेते रविंद्र भैय्यासाहेब पाटिल म्हणाले हा मतदारसंघ कायम शरद पवार यांच्या धर्मनिरपेक्ष व विकासाभिमुख विचारांनी प्रेरित होऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीशी राहिला आहे.

राज्यातील सत्ताधाऱ्यांनी सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले असुन ते आता विविध योजनांच्या माध्यमातून प्रलोभने दाखवून आपल्या वरील गद्दारीचा शिक्का पुसु पाहत आहेत आणि मतदारांना विकत घेऊ पाहत आहेत. परंतु या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या अस्मितेशी खेळणाऱ्या गद्दारांना मातीत गाडून महाराष्ट्राची अस्मिता जपणाऱ्या सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या पाठिशी उभे राहण्याचे त्यांनी उपस्थितांना आवाहन केले.

यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना रोहिणी खडसे म्हणाल्या, सत्ताधाऱ्यांनी महागाई कमी करण्याचे, शेतमालाला हमीभाव देण्याचे युवकांना रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु सत्ताधाऱ्यांनी शेतकरी, कष्टकरी, महिला युवकांच्या प्रश्नांकडे साफ दुर्लक्ष केले आणि आता निवडणुकीच्या तोंडावर विविध योजना जाहीर केल्या. परंतु एका हाताने मदत देत असताना दुसरीकडे प्रचंड महागाई करून दिलेली मदत काढून घेण्याचे काम सत्ताधारी करत आहेत आपल्या मतदारसंघात आ एकनाथराव खडसे यांच्या माध्यमातून अनेक विकास कामे झाली. परंतु गेल्या पाच वर्षात या मतदारसंघाचा विकास रखडला आहे रखडलेल्या विकासाला चालना देण्यासाठी, आ एकनाथराव खडसे यांनी मुहूर्तमेढ रोवलेल्या बोदवड उपसा सिंचन योजना आणि इतर योजना राजकीय द्वेषभावनेतून निधी अभावी रखडलेल्या आहेत.

या योजनांना निधी उपलब्ध करून देऊन त्या पुर्णत्वास नेऊन शेतीला पाणी उपलब्ध करून देण्यासाठी या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष महाविकास आघाडीच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहून विधानसभा निवडणुकीत साथ व आशीर्वाद देण्याचे रोहिणी खडसे यांनी उपस्थितांना आवाहन केले.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.