सुरक्षा मंत्रालयाच्या कंपनीमध्ये मोठी पदभरती; 10वी पाससाठी परीक्षेशिवाय नोकरीची संधी..

नोव्हेंबर 28, 2025 3:14 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । तुम्हीही नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. भारत सरकारच्या सुरक्षा मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या कंपनीमध्ये मोठी पदभरती निघाली आहे. भारत डायनामिक्स लिमिटेडमध्ये अप्रेंटिस पदांसाठी भरती जाहीर झालीय. या नोकरीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

BDL

फिटर, इलेक्ट्रिशियमन, मेकॅनिस्ट, वेल्डर अशा अनेक पदांसाठी भरती होणार आहे. विविध ट्रेड विभागात भरती होणार आहे. या भरतीद्वारे १५६ पदे भरली जातील. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया ८ डिसेंबरपासून सुरु होणार आहे. तुम्हाला १२ डिसेंबरपर्यंत अर्ज करायचा आहे.तुम्ही bdl-india.in वर जाऊन अर्ज करु शकतात. अप्रेंटिसशिपमध्ये ट्रेनिंग कालावधीत तुम्हाला स्टायपेंडदेखील मिळणार आहे.

Advertisements

भारत डायनामिक्समधील ही भरती कोणत्याही परीक्षेशिवाय होणार आहे. तुमची निवड थेट मेरिट लिस्टद्वारे होणार आहे. त्यामुळे तुमच्या शैक्षणिक पात्रतेनुसार नियुक्ती केली जाणार आहे.

Advertisements

अप्रेंटिस पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून १०वी पास असणे गरजेचे आहे. याचसोबत त्याच्याकडे आयटीआय सर्टफिकेट असावे. या नोकरीसाठी अर्ज करताना राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट मिळणार आहे.

अर्ज कसा करावा?

सर्वात आधी https://www.apprenticeshipindia.gov.in/ या वेबसाइटवर जायचे आहे.
तिथे तुम्हाला भारत डायनामिक्स लिमिटेड, अप्रेंटिंस असं दिसेल त्यावर क्लिक करा.
यानंतर आधार नंबर, नाव, जन्मतारीख टाकून रजिस्ट्रेशन करायचे आहे.
यानंतर तुमची शैक्षणिक माहिती भरायची आहे.
यानंतर तुमचा फोटो आणि सही अपलोड करा.
यानंतर अर्ज सबमिट केल्यानंतर प्रिंट आउट काढून ठेवा.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now