⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | पुन्हा-पुन्हा बत्ती गुल, नो चिंता : रायसोनीच्या विद्यार्थ्यांनी शोधला उपाय

पुन्हा-पुन्हा बत्ती गुल, नो चिंता : रायसोनीच्या विद्यार्थ्यांनी शोधला उपाय

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १ नोव्हेंबर २०२१ । आजकाल नागरिकांना पुन्हा पुन्हा लाईट जाण्याच्या समस्येने मोठ्याप्रमाणात हैराण करून सोडले आहे यावर उपाय म्हणून शहरातील जी.एच.रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मेनेजमेंट महाविदयालयाच्या विद्युत विभागातील तुषार बोरसे, तेजस महाजन, योगेश गिरासे, मयुर पाटील या विद्यार्थ्यांनी उपाय शोधला आहे.

जी.एच.रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मेनेजमेंट महाविदयालयाच्या विद्युत विभागातील तुषार बोरसे, तेजस महाजन, योगेश गिरासे, मयुर पाटील या विद्यार्थ्यांनी लाईट जाण्याच्या समस्येवर तात्काळ व मानवविरहित असे स्वयंचलित प्रकल्पाची निर्मिती केली आहे. एखाद्या परिसरातील लाईट गेली तर दुसऱ्या कनेक्शनवरून त्या परिसराला स्मार्टली व तात्काळ विद्युत पोहोचविण्याचे काम हा स्वयंचलित प्रकल्प करणार आहे. तसेच क्षमतेपेक्षा अधिक विद्युत उपकरणे वापरल्यामुळे त्याठिकाणी होणारा विजेचा अभाव आपण थांबवू शकतो हे देखील या प्रकल्पाचे प्रमुख उद्दिष्ट आहे.

ईलेक्ट्रिसिटी डीस्ट्रीब्युशन कंट्रोल सिस्टीम हा प्रकल्प रायसोनी महाविद्यालयातील विद्युत विभागप्रमुख बिपासा बी. पात्रा यांच्या मार्गदर्शनाखाली विध्यार्थ्यानी यशस्वीरित्या पूर्ण केलेला असून या प्रकल्पाच्या पुढील भविष्यासाठी रायसोनी इस्टीट्यूटचे संचालक प्रितम रायसोनी व संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

author avatar
चेतन वाणी
पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.