Bhusawal News-जळगाव लाईव्ह न्यूज । १५ ऑक्टोबर २०२२ । भुसावळ तालुक्यातील कुर्हा शिवारातील सुराणा ट्रेडर्सच्या गोदामातून चोरट्यांनी साडेपाच हजार रुपये किंमतीचे साहित्य लांबवले. या प्रकरणी भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विजय चतरसिंग परदेशी (कुर्हापानाचे) यांनी तालुका पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार्रें त्यांचे कुर्हा शिवारात सुराणा ट्रेडर्स नामक गोदाम असून 12 ते 13 दरम्यान चोरट्यांनी गोदामाच्या भिंतीवरून प्रवेश करीत दोन हजार रुपये किंमतीचा फवारणी पंप, दोन हजार रुपये किंमतीचा सीपीयु मॉनिटर, दिड हजार रुपये किंमतीचे डिजिटल मीटर असे एकूण पाच हजार 500 रुपयांचे साहित्य लांबवले. तपास नाईक दीपक जाधव करीत आहेत.